scorecardresearch

१० वी पास असणाऱ्यांना RBI मध्ये नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदासाठी भरती, आजच अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२३ असेल.

Reserve Bank of India
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) येथे ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बॅंकेला वाहन चालकांची गरज असल्याने ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, काम करण्याचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची माहिती जाणून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) येथे ड्रायव्हर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२३ आहे.

एकूण रिक्त पदे – ०५

पदाचे नाव – ड्रायव्हर

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १६ हजार ८३८ पदांसाठी मेगाभरती, सविस्तर माहिती जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता –

१० वी पास + हलके वाहन चालक (LMV) परवाना + १० वर्षेचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – २८ ते ३५ वर्षापर्यंत तर मागासवर्गीयांना ५ वर्षाची सूट देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क –

खुला वर्ग आणि ओबीसीसाठी ४५० रुपये + GST

मागासवर्गीय/ महिला/ माजी सैनिक ५० रुपये + GST

नोकरी ठिकाण – मुंबई</strong>

महत्वाच्या तारखा –

हेही वाचा- ७ वी पास असणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात २७ मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२३

भरतीची जाहीरात बघण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1StJv8_D-Plr1Tz-ClgSJ38S90jFn-Mqk/view) या लिंकला भेट द्या.

या भरतीसाठीची अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बॅंकेच्या https://www.rbi.org.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या