scorecardresearch

Premium

नोकरीची संधी

(२) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसी रिसर्च ((DEPR) – ३८ पदे.

rbi recruitment 2023 job opportunity in rbi different job posts in rbi
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

सुहास पाटील

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑफिसर्स ग्रेड-बीच्या एकूण २९१ पदांची भरती. (Advt. No. ३/२०२३-२४)

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

(१) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) जनरल – २२२ पदे.  पात्रता : (दि. १ मे २०२३ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ दिव्यांग – ५० टक्के गुण) किंवा पदव्युत्तर पदवी/ समतूल्य टेक्निकल पात्रता परीक्षा किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ दिव्यांग – उमेदवारांना गुणांची अट नाही).

(२) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसी रिसर्च ((DEPR) – ३८ पदे.

पात्रता : (ए) इकॉनॉमिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा (बी) फिनान्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा वरील ए व बी परीक्षा सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण 

(३) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अ‍ॅण्ड इन्फॉरमेशन मॅनेजमेंट (DSIM)) – ३१ पदे. 

पात्रता : (ए) स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/ इकॉनोमॅट्रिक्स/ स्टॅटिस्टिक्स अ‍ॅण्ड इन्फॉरमॅटिक्स अप्लाईड स्टॅटिस्टिक्स अ‍ॅण्ड इन्फॉरमेटिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

किंवा (बी) मॅथेमॅटिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि १ वर्ष कालावधीचा स्टॅटिस्टिक्स विषयातील डिप्लोमा उत्तीर्ण.

किंवा (सी) डेटा सायन्स/AI/ML//बिग डेटा अ‍ॅनालायटिक्समधील पदव्युत्तर पदवी सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण

किंवा (डी) डेटा सायन्स/ /AI/ML/Big Data Analytics  मधील ४ वर्ष कालावधीची पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा (ई) २ वर्ष कालावधीचा डिप्लोमा PGDBA सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (ए ते ई साठी अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना पात्रता परीक्षेत किमान सरासरी ५० टक्के गुण)

CGPA/ DGPA/ CPI on a १० point scale (i) ६.७५ ÷ ६० टक्के सरासरी गुण, (ii) ६.२५ ÷ ५५ टक्के सरासरी गुण, (iii) ५.७५ ÷ ५० टक्के सरासरी गुण.

वयोमर्यादा : दि. १ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० वर्षेपर्यंत. M. Phil.  पात्रताधारकांसाठी वयोमर्यादा ३२ वर्षे व Phd. पात्रताधारकांसाठी वयोमर्यादा ३४ वर्षे. Scheduled Commercial Bank/ Exim/ Nabard/ Sidbi/ RBI बँकेतील अनुभव असल्यास अनुभवा इतके वर्षांची वर्यामर्यादेत सूट दिली जाईल. (जास्तीत जास्त ३ वर्षे)

वेतन : बेसिक पे रु. ५५,२००/- अधिक इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा (एचआरएशिवाय) रु. १,१६,९१४/- (अकोमोडेशन न घेतल्यास बेसिक पेच्या १५ टक्के घरभाडे भत्ता दिला जाईल.)

निवड पद्धती : सर्व पदांसाठी निवड ऑनलाइन परीक्षा फेज – १ आणि फेज – २ व इंटरह्यू घेवून केली जाईल.  (Gr. B(DR) General) पदांसाठी ऑनलाइन परीक्षा – फेज-१ परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे (गोव्यासाठी – पणजी).

ऑनलाइन परीक्षा फेज -२ साठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – मुंबई/ नवी मुंबई, पुणे, नागपूर. ऑफिसर्स इन ग्रेड-बी (DR) General पदांसाठी ऑनलाइन परीक्षा फेज-१ दि. ९ जुलै २०२३ रोजी घेतली जाईल.

ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) जनरल पदांकरिता फेज-१ परीक्षा २०० गुणांसाठी, एकूण वेळ १२० मिनिटे  (अभ्यासक्रम RBI च्या जाहिरातीमध्ये Appendix- II मध्ये उपलब्ध आहे.) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीर्आ) जनरलसाठी फेज-२ (पेपर-१, पेपर-२ व पेपर-३ ऑनलाइन परीक्षा) दि. ३० जुलै २०२३ रोजी घेतली जाईल.

फेज-२ परीक्षा – पेपर-१ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड सोशल इश्यूज – वेळ ३० मिनिटे – ५० गुण आणि डिस्क्रिप्टीव्ह ६ प्रश्न, वेळ ९० मिनिटे, ५० गुण, एकूण १२० मिनिटे, एकूण १०० गुण.  पेपर-२ इंग्लिश (रायटिंग स्किल्स) डिस्क्रीप्टिव्ह उत्तरांसाठी ३ प्रश्न, वेळ ९० मिनिटे, एकूण गुण १००.

पेपर-३ (ऑप्शनल विषय) जनरल फिनान्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट – ५० टक्के ऑब्जेक्टिव्ह टाईप – ३० प्रश्न, गुण – ५० आणि ५० टक्के डिस्क्रीप्टीव्ह टाईप, ६ प्रश्न  गुण – ५०. एकूण वेळ १२० मिनिटे, एकूण गुण १००. फेज- I व फेज- II (DEPR/ DSIM) साठी परीक्षा केंद्र – मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे इ.

इंटरव्ह्यू – फेज-२ मधून निवडलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्य़ूपूर्वी सायकोमेट्रिक टेस्ट द्यावी लागेल. यातून पात्र उमेदवारांची ७५ गुणांसाठी इंटरह्यू घेतला जाईल. अंतिम निवड स्टेज-२ व इंटरव्ह्यूमधील एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल. (नियमाप्रमाणे काही ग्रेस मार्क्‍स मिळविले जातील.)

ऑफिसर्स ग्रेड-बी (डीर्आ) (DEPR) व ऑफिसर्स ग्रेड-बी (डीर्आ) (DSIM) पदांसाठी फेज-१ – पेपर-१ ऑनलाइन परीक्षा १६ जुलै २०२३ रोजी घेतली जाईल व फेज-२ (पेपर-२ आणि पेपर-३ ऑनलाइन/ लेखी परीक्षा) दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी घेतली जाईल. (अभ्यासक्रम आणि निवड पद्धती RBI च्या जाहिरातीमधील अ Appendix- III मध्ये उपलब्ध आहे.)

अर्जाचे शुल्क आणि इंटिमेशन चार्जेस – रु. ८५०/- (अजा/ अज/ दिव्यांग यांना फक्त इंटिमेशन चार्जेस रु. १००/- भरावे लागतील.)  १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. शंकासमाधानासाठी http://cgrs. ibps.in या लिंकवर संपर्क साधावा.

उमेदवारांनी आपल्या सोयीचे सेंटरच्या रिजनल डायरेक्टर/ जनरल मॅनेजर, फइक यांचेकडे वेबसाईटवर Annexure- IV  मध्ये उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून ई-मेल पुढील पत्त्यावर दि. ९ जून २०२३ पर्यंत पाठवावा.  (i) नवी मुंबई रिजनल सेंटरसाठी cgmbelapur@rbi. org.in (ii) नागपूर रिजनल सेंटरसाठी rdnagpur@rbi.org.in  (iii) पुणे रिजनलसाठी principalcab@rbi.org.in विहीत नमुन्यातील अर्ज http://www.rbi.org.in या संकेतस्थळावरील (Appendix-I) मधून ९ जून २०२३ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.  suhassitaram@yahoo.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi recruitment 2023 job opportunity in rbi different job posts in rbi zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×