REC recruitment 2023: ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिडेट (Rural Electrification Corporation Limited) या शासनाच्या संस्थेमध्ये भरती सुरु होणार आहे. १२५ रिक्त जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करायची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२३ पर्यंत यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करुन भरती निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. recindia.nic.in. या अधिकृत वेबसाइटवर या भरती संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
या भरतीमध्ये सहभागी होणारे उमेदवार इंजिनीअरिंग डिसिप्लेन, फायनान्स अॅंड अकाउंट्स डिसिप्लेन, ह्युमन रिसोर्स डिसिप्लेन, इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी डिसिप्लेन, कॉरपोरेट कम्युनिकेशन डिसिप्लेन, लॉ डिसिप्लेन, कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी डिसिप्लेन अशा काही विभागातील नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकतात. विभाग आणि पद यांच्यावरुन वेतनासंबंधित निर्णय घेतले जातील.
आणखी वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील सरकारी रुग्णालयात ५ हजार जागांसाठी मेगाभरती; सविस्तर माहिती जाणून घ्या
आरईसी लिमिटेडद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना १००० रुपये शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. अनुसूचित जाती-जमातीमधील उमेदवार, दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक आणि अंतर्गत उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात येईल.
ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिडेटच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी-
- recindia.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
- होमपेजवरील Career या टॅबवर क्लिक करावे.
- त्यामध्ये भरतीसाठीचा अर्ज दिसेल. त्यामध्ये योग्य माहिती भरावी.
- अर्ज भरुन पुर्ण झाल्यावर नमूद केलेले शुल्क भरावे.
- भरतीसाठी आवश्यक असलेले कागद अर्जाला जोडावे.