हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर विविध पदांवर भरती केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १ फेब्रुवारीला सुरु होणार असून ती २५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात सोडू नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरतीच्या अधिकच्या माहितीसाठी तुम्ही https://www.hindustanpetroleum.com या HPCL च्या अधिकृत बेवसाईटला भेट देऊ शकता. शिवाय HPCL ने कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट काय आहे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हेही वाचा- Central Bank of India मध्ये बंपर भरती; दरमहा ८०,००० पेक्षा जास्त असेल पगार

असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन –

या पदासाठी एकूण ३० जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता – B.Sc. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – १८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३

असिस्टंट बॉयलर टेक्निशियन –

हेही वाचा- इंजिनियरिंग उत्तीर्ण तरुणांना नोकरीची मोठी संधी; ५० हजार मिळेल पगार, जाणून घ्या भरतीची प्रक्रिया

या पदासाठी एकूण ७ जागा असून त्यासाठीची शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण किंवा ITI, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

वयाची अट – १८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३

असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर –

या पदासाठी एकूण १८ जागा आहेत

शैक्षणिक पात्रता – 1. बारावी (विज्ञान) उत्तीर्ण 2. बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेजकडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा ६० टक्के गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा 3. अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट – १८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३

हेही वाचा- बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी; SBI मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अधिकची माहिती

असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) –

या पदासाठी एकूण ५ जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३

अधिकच्या माहितीसाठी https://www.hindustanpetroleum.com या बेवसाईटला भेट द्या.

अर्ज असा भरा –

HPCL भरती २०२३ साछी उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज भरा

  • HPCL च्या अधिकृत साईट https://www.hindustanpetroleum.com. ला भेट द्या.
  • करिअर -> जॉब ओपनिंग वर क्लिक करा.
  • नवीन HPCL टेक्निशियन रिक्त जागा स्क्रीनवर दिसतील.
  • अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व तपशील तपासून अर्ज शुल्क जमा करा
  • अर्ज सबमिट करा आणि तो सेव्ह करा

इतका पगार मिळेल –

पात्र उमेदवारांना २७५०० ते १००००० दरम्यान वेतन दिले जाणार आहे.

अधिकच्या माहितीसाठी https://www.hindustanpetroleum.com या बेवसाईटला भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment 2023 great opportunity in hindustan petroleum corporation limited for 12th pass salary up to 1 lakh jap
First published on: 02-02-2023 at 13:43 IST