केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती बोर्डमार्फत अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांची नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ( NTPC) च्या एकूण १,६८८ पदांची २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डमध्ये भरती. (RRB मुंबई – एकूण १४०,  RRB अहमदाबाद – एकूण २६)

रिक्त पदांचा तपशील –

(१) कमर्शियल कम टिकेट क्लर्क – एकूण ७००

(RRB मुंबईमधील एकूण – ३० पदे –  CR – ३०) (RRB अहमदाबाद  WR – १).

(२) अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट – एकूण २०० (RRB मुंबई एकूण ४२ पदे –  CR – २२,  WR – २०).

(३) ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट – एकूण ६००

(RRB मुंबई एकूण ५६ पदे –  CR – २०,  WR – ३६) (RRB अहमदाबाद  WR – १८).

(४) ट्रेन्स क्लर्क – एकूण १८८ ( RRB मुंबई एकूण १२ पदे –  CR – १०,  WR – २)

(RRB अहमदाबाद  WR – ७).

एकूण पदांपैकी १० टक्के  पदे माजी सैनिकांसाठी व ७ टक्के पदे अपंग उमेदवारांसाठी राखीव.

पात्रता – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) सर्व पदांसाठी (१२ वी किमान ५० टक्के गुणांसह) उत्तीर्ण. अजा/अज/अपंग/मा.सै. तसेच १२ वीपेक्षा अधिक पात्रताधारक उमेदवारांना १२वीला ५० टक्के गुणांची अट लागू नाही. पद क्र. २ अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि पद क्र. ३ ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी संगणकावरील हिंदी / इंग्लिश टायपिंग प्रोफिशियन्सी अनिवार्य.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२७ रोजी) १८ ते ३० वर्षे

(UR &  EWS उमेदवारांचा जन्म दि. १ जानेवारी २००९ ते २ जानेवारी १९९७ दरम्यानचा असावा.) (विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) अनआरक्षित पदांसाठी अजा/अज/इमावच्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार नाही.

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; (३ वर्षांची सेवा झालेले रेल्वे कर्मचारी (ग्रुप-सी आणि पूर्वीचे ग्रुप-डी)) अपंग खुला/ईडब्ल्यूएस – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/ अज – १५ वर्षे); (रेल्वेच्या क्वासी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेसमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी – सेवाकाल किंवा ५ वर्षे जे कमी असेल ते);

वेतन श्रेणी – पद क्र. १ साठी पे-लेव्हल – ३ (रु. २१,७००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ४५,०००/-; पद क्र. २ ते ४ साठी पे-लेव्हल – २ (रु. १९,९००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३८,०००/-.

निवड पद्धती – स्टेज-१ – कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) (सर्व पदांसाठी सामायिक) जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, मॅथेमॅटिक्स – ३० प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ३० प्रश्न, एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण असे एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.  CBT मधील नॉर्मलाईज्ड् केलेल्या गुणवत्तेनुसार स्टेज-२  CBT साठी निवड होईल. 

स्टेज-२ – (i)  CBT – जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, मॅथेमॅटिक्स – ३५ प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ३५ प्रश्न, एकूण १२० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १२० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.

(ii)कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट (CBTST) – ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट आता द्यावी लागणार नाही. परंतु उमेदवारांचे कॉम्प्युटरवर ३० श.प्र.मि. वेगाने इंग्लिश टायपिंग किंवा २५ श.प्र.मि. वेगाने हिंदी टायपिंगमधील कौशल्य रेल्वे जॉईन झाल्यानंतर तपासले जाईल.

(iii) कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी

अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती  rrbapply. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 ऑनलाइन अर्ज करताना येणार्‍या शंकासमाधानासाठी ई-मेल –  rrb. help@csc. gov. in, फोन नं. – ९५९२००११८८ /०१७२५६५३३३३.

युनिफाईड ऑफिशियल  RRB वेबसाईट  https:// rrb. indianrailways. gov. in यावरील लिंकमधून उमेदवाराने निवडलेल्या  RRB साठी ऑनलाइन अर्ज दि. १३ नोव्हेंबर २०२६ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

(RRB मुंबईचा संपर्क क्रमांक – ०२२-६७६४४०३३)