रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (  RRBs) (रेल्वे मंत्रालय, भारत सरकार), देशभरातील २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डमध्ये पॅरा मेडिकलच्या विविध पदांवर भरती. एकूण रिक्त पदे – ५९०…..

RRB मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे – ६१.

(१) नर्सिंग सुपरिटेंडंट –

एकूण ३६५ पदे. सेंट्रल रेल्वे – ३३ (अजा – ८, अज – १, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३) (१ पद अपंग कॅटेगरी  छऊ साठी आणि ४ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पात्रता – (दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी) GNM किंवा B. Sc. (Nursing)  किंवा  अठट मिडवाईव्हज, मिडवाईव्ह्ज आणि बी ग्रेड नर्स. (नर्स अँड मिडवाईफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट)

(२) डायलिसिस

टेक्निशियन – एकूण १ पद.

पात्रता –   B. Sc. आणि हिमोडायालिसिस डिप्लोमा किंवा हिमोडायलिसिस कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव किंवा इन हाऊस ट्रेनिंग.

(३) हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड- II –  

एकूण ४३ पदे.

सेंट्रल रेल्वे – ६

(अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ३).

पात्रता – बी.एससी. (केमिस्ट्री विषयासह) पदवी आणि १ वर्षाचा हेल्थ/सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट.

(४) ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट

– एकूण १ पद.

पात्रता – ऑडिओलॉजी, स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी (  BASLP) पदवी आणि रिहॅबिलिटेशन काऊन्सिल ऑफ इंडिया रजिस्ट्रेशन.

(५) फार्मासिस्ट (एन्ट्री ग्रेड) 

एकूण ११८ पदे. सेंट्रल रेल्वे – १२ (अजा – ३, अज – १, इमाव – २, खुला – ६) (१ पद अपंग कॅटेगरी व्हीआय साठी आणि २ पदे एलडी साठी राखीव).

पात्रता – १२ वी आणि फार्मसी डिप्लोमा किंवा डिग्री. (फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन आवश्यक)

(६) रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन –

एकूण २५ पदे. सेंट्रल रेल्वे ( उफ) – ४ पदे (अज – १, खुला – ३).

पात्रता – १२ वी (फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांसह) आणि रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निशियन/रेडिओडायग्नोसिस टेक्नॉलॉजीमधील २ वर्षांचा डिप्लोमा. (बी.एससी. आणि रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निशियन/रेडिओ डायग्नोसिस टेक्नॉलॉजी डिप्लोमाधारक उमेदवारांना प्राधान्य.)

(७) ईसीजी टेक्निशियन –

एकूण ४ पदे.

पात्रता – १२ वी (विज्ञान) विज्ञान शाखेतील पदवी आणि इसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी/कार्डिऑलॉजी/कार्डिऑलॉजी टेक्निशियन विषयातील सर्टिफिकेट/पदविका/पदवी. यूसीजी मान्यताप्राप्त संस्थेकडील दूरस्थ अभ्यासक्रमाने अशी पदवी/पदविका मिळविणारे अर्ज करण्यास पात्र आहेत.

(८) ऑप्टोमेट्रिस्ट –

एकूण २ पदे.

पात्रता – बी.एससी. (ऑप्टोमेट्रि) किंवा ऑप्थेल्मिक टेक्निशियन डिप्लोमा (३ ते ४ वर्षं कालावधीचा) आणि संबंधित काऊन्सिलकडील रजिस्ट्रेशन.

(९) लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड- II

– एकूण ३१ पदे. सेंट्रल रेल्वे – ६ (अजा – १, इमाव – १, खुला – ४).

पात्रता – १२ वी विज्ञान आणि  DMLT किंवा १ वर्ष कालावधीचा  DMLT सर्टिफिकेट कोर्स.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२७ रोजी) पद क्र. १ साठी २० ते ४ वर्षे; पद क्र. २ साठी २० ते ३३ वर्षे; पद क्र. ४ साठी २१ ते ३ वर्षे; पद क्र. ५ साठी २०३५ वर्षे. पद क्र. ३, ६ ते ९ साठी १८ ते ३३ वर्षे (सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादेज सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे) (विधवा/घटस्फोटित/कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला – ३५/इमाव – ३८/ अजा/अज – ४० वर्षे).

निवड पद्धती – स्टेज-१ – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन फोन नं. ९५९२००११८८, ०१७२५६५३३३३; ई-मेल – rrb.help@csc.gov.in

उमेदवारांनी आपल्या पसंतीचे आरआरबी मंडळ निवडून त्या मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. १४ ऑक्टोबर २०२६ (२३.५९ वाजे)पर्यंत करावा. उदा. आरआरबी, मुंबई –  www.rrbmumbai.gov.in ; आरआरबी, अहमदाबाद –  www.rrbahmedabad.gov.in