सोसायटी फॉर मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आयआयटी कैंपस, पवई, मुंबई. मुंबई/ नवी मुंबई युनिट्समध्ये विविध प्रोजेक्ट्सवर पुढील पदांची करारपद्धतीने भरती. ( Advt. No. 05/2024) (कराराचा अवधी २ वर्षं किंवा प्रोजेक्टच्या कालावधीपर्यंत जे कमी असेल त्याप्रमाणे)

(१) प्रोजेक्ट टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) A ( PT- EL) – २० पदे.

what is waterspout
यूपीएससी सूत्र : डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज अन् वॉटरस्पाउट म्हणजे काय? वाचा सविस्तर…
Indian Navy Recruitment 2024 Apply for SSR Medical Assistant Posts
Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेडिकल असिस्टंट पदासाठी होणार भरती, ६९, १०० रुपयापर्यंत मिळू शकतो पगार
Soundararajan brothers owner of suguna foods started poultry business now owns crores company Indias richest poultry farmers
बारावीनंतर सोडलं शिक्षण अन् सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, आता आहेत कोट्यवधींचे मालक; जाणून घ्या सौंदरराजन भावंडांची अनोखी यशोगाथा
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
how to write resignation letter
Resignation Letter : राजीनामा पत्र कसे लिहावे? जाणून घ्या, कोणते महत्त्वाच मुद्दे मांडावे?
Success Story of Dr Akram Ahmad
Success Story : इच्छा तेथे मार्ग! सहा लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं परदेश; वाचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप लाँच करणाऱ्याची यशोगाथा
Career mantra UPSC exam science NCERT
करिअर मंत्र
mpsc Mantra Social Geography Civil Services Main Exam
mpsc मंत्र: सामाजिक भूगोल; राज्यसेवा मुख्य परीक्षा
Job Opportunity Opportunities in Indo Tibetan Border Police Force
नोकरीची संधी: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समधील संधी

(२) प्रोजेक्ट टेक्निशियन (फिटर) A ( PT- FT) – ८ पदे.

(३) प्रोजेक्ट टेक्निशियन (मशिनिस्ट) B ( PT- MC) – ३ पदे.

(४) प्रोजेक्ट टेक्निशियन (टर्नर) B ( PT- TU) – ३ पदे.

पद क्र. १ ते ४ साठी पात्रता संबंधित ट्रेडमधील आयटीआय आणि एनसीटीव्हीटी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(५) प्रोजेक्ट असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) A ( PA- EL) २५ पदे. इंटरव्ह्यू दि. २२ ऑगस्ट २०२४.

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा किमान ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(६) प्रोजेक्ट असिस्टंट (फिजिक्स) A ( PA- PH) ४ पदे. इंटरव्ह्यू दि. २२ ऑगस्ट २०२४.

पात्रता : बी. एससी. (फिजिक्स) किमान ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण.

हेही वाचा >>> नोकरीची संधी: ‘महाट्रान्सको’मधील संधी

(७) रिसर्च सायंटिस्ट (इलेक्ट्रॉनिक्स) RS- EL – ३० पदे.

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर

(८) रिसर्च सायंटिस्ट (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स)- RS- IT – ४ पदे.

पदवी किंवा एम्. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(९) सिनियर रिसर्च सायंटिस्ट (इलेक्ट्रॉनिक्स) SRS- EL ( A) ३ पदे.

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/ मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एम्. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव.

(१०) सिनियर रिसर्च सायंटिस्ट (इलेक्ट्रॉनिक्स) SRS- EL ( B) १ पद.

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/ मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एम्. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव.

पद क्र. १० साठी इष्ट पात्रता MBA पदवी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट व HRM मधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा (दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी) प्रोजेक्ट टेक्निशियन आणि प्रोजेक्ट असिस्टंट (A) अनुभव नसलेले उमेदवार २५ वर्षे, प्रोजेक्ट असिस्टंट (B) ३ वर्षांचा अनुभव असल्यास ३५ वर्षे, रिसर्च सायंटिस्ट ३० वर्षे, सिनियर रिसर्च सायंटिस्ट ३५ वर्षे.

दरमहा एकत्रित वेतन : प्रोजेक्ट टेक्निशियन (A) रु. १५,१००/-, प्रोजेक्ट टेक्निशियन (B) १९,१००/-, प्रोजेक्ट असिस्टंट (A) रु. १७,०००, रिसर्च सायंटिस्ट रु. ३०,०००/-; सिनियर रिसर्च सायंटिस्ट रु. ३९,२००/-.

निवड पद्धती : SRS आणि RS (पद क्र. ७ ते १०) पदांच्या आवश्यकतेनुसार लेखी/ स्क्रीनिंग टेस्ट दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी घेतली जाईल आणि या पदांसाठी इंटरव्ह्यू दि. २३ ऑगस्ट २०https://recruit.sameer.gov.in२४ रोजी घेतला जाईल.

उमेदवारांना https://sameer.gov.in या वेबलिंकवरून स्क्रिनींग टेस्ट आणि इंटरव्ह्यूचे कॉल लेटर डाऊनलोड करता येईल. प्रोजेक्ट असिस्टंट (प्रोजेक्ट टेक्निशियन पदांसाठी लेखी परीक्षा आणि/ किंवा स्किल टेस्ट घेतली जाईल.) अंतिम निवड इंटरव्ह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. ऑनलाइन अर्ज https://recruit.sameer.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.