भारतीय स्टेट बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई – ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत ७१५० ॲप्रेंटिसेस पदांची भरती.

राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील (कंसात स्थानिय भाषा दिली आहे.) -महाराष्ट्र (मराठी) -५०४ पदे (अजा – ५०, अज – ४४, इमाव – १३५, ईडब्ल्यूएस – ५०, खुला – २२५) (२१ पदे दिव्यांग कॅटेगरी व्हीआय – ६, एचआय – ६, एलडी – ५, डी अँड ई – ४). गुजरात (गुजराती) -२१७, आंध्र प्रदेश (तेलुगू/उर्दू) -७०९, कर्नाटक (कन्नडा) -२७६, मध्य प्रदेश (हिंदी) -२८५, गोवा (कोंकणी) -१६ इ.

महाराष्ट्रातील जिह्यानुसार रिक्त पदांचा तपशिल – अकोला – १२, अमरावती – १२, बुलढाणा – १०, वाशिम – १०, अहमदनगर, १३, औरंगाबाद – १४, बीड – ११, जालना – ११, कोल्हापूर – १३, सांगली – १३, भंडारा – १०, चंद्रपूर – १०, गडचिरोली – ११, गोंदिया – ११, नागपूर – १३, वर्धा – १०, हिंगोली – १०, लातूर – १२, नांदेड – १२, उस्मानाबाद – १२, परभणी – १२, धुळे – ११, जळगाव – १२, नंदूरबार – ११, नाशिक – १६, पुणे – २०, सोलापूर – १४, मुंबई आणि मुंबई उपनगरे – ९०, रत्नागिरी – ४, सातारा – १३, सिंधुदुर्ग – ३, रायगड – १५.

वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०२६ रोजी) २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल २००६ ते दि. २ एप्रिल १९९८ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग

१० वर्षे)

पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी उत्तीर्ण.

ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल.

स्टायपेंड – ॲप्रेंटिसेसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती – ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाइन लेखी परीक्षा १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे.

परीक्षा शुल्क/सूचना शुल्क – खुला/इमाव/ईडब्ल्यूएस – रु.३००/-.

ऑनलाइन अर्ज  https:// bank. sbi/ careers किंवा  https:// sbi. co. in/ careers या संकेतस्थळावर ८ जून २०२६ पर्यंत करावेत.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत ५,००० ॲप्रेंटिसेसची भरती.

राज्यनिहाय रिक्त पदे (कंसात संबंधित राज्याची स्थानीय भाषा दिलेली आहे.) – महाराष्ट्र (मराठी) – ५८० (अजा – ५८, अज – ५२, इमाव – १५६, ईडब्ल्यूएस – ५८, खुला – २५६) (२३ पदे दिव्यांग (कॅटेगरी  OC – ६,  HI – ६,  VI – ६,  ID – ५) साठी राखीव). राज्यनिहाय ट्रेनिंग सेंटर्सची यादी जाहिरातीमधील  Annexure- अ मध्ये उपलब्ध आहे.

गोवा (मराठी कोकणी) – २९ (अज – ३, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – १९).

गुजरात (गुजराती) – ९६०, कर्नाटक (कन्नड) – ४८३, मध्य प्रदेश (हिंदी) – १३६, तेलंगणा (तेलुगू, ऊर्दू) – ८३, छत्तीसगड (हिंदी) – १२२, आंध्र प्रदेश (तेलुगू, ऊर्दू) – १८८, दादरा नगर हवेली (गुजराती, कोकणी, मराठी) – ७ इ.

पात्रता – (दि. १ मे २०२६ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील) दि. १ मे २०२२ नंतर उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. १ मे २०२६ रोजी) २०-२८ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – ६ वर्षे) (कमाल वयोमर्यादा ३४ वर्षेपर्यंत).

ट्रेनिंगचा कालावधी – १२ महिन्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग. ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या शेवटास ॲप्रेंटिसेसना अंतिम असेसमेंट टेस्ट द्यावी लागेल. असेसमेंट टेस्टमधील गुणांच्या आधारे ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जारी केले जाईल.

स्टायपेंड दरमहा – रु. १५,०००/- दरमहा.

निवड पद्धती – (i) ऑनलाइन परीक्षा, (ii) कागदपत्र पडताळणी, (iii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. (१० वी/१२ वीला संबंधित लोकल लँग्वेज अभ्यासल्याचा पुरावा सादर करणाऱया उमेदवारांना टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज द्यावी लागणार नाही.) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह परीक्षा – १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे.

अर्जाचे शुल्क – खुला/ईडब्ल्यूएस आणि इमावचे पुरुष उमेदवार – रु. ८००/-   जीएसटी, दिव्यांग/अजा/अज उमेदवार – रु. २००/-. खुला/ईडब्ल्यूएस/इमावच्या महिला उमेदवार – रु. ६००/- अधिक जीएसटी.

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दि. ८ जून २०२६.