SBI Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये काही पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बँकेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अनेक बँकांना आपल्या शाखांचा कारभार सुरळीतपणे पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यासाठी बँक वेळोवेळी कर्मचाऱ्यांची भरती करत असते. त्यामध्ये कधी फ्रेशर्सना संधी देतात तर कधी अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते. सध्या एसबीआईने अनुभवी लोकांची कराराच्या आधारावर सपोर्ट ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

एसबीआय २०२३ भरती अधिसूचनेनुसार, सपोर्ट ऑफिसरपदाच्या ९ जागा रिक्त आहेत. निवडलेल्या उमेदवारांची एका वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठीचे पात्रता निकष, वयोमर्यादा, पगार, याबाबतची अधिकची माहिती जाणून घेऊया.

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

हेही वाचा- महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील सरकारी रुग्णालयात ५ हजार जागांसाठी मेगाभरती; सविस्तर माहिती जाणून घ्या

एसबीआय २०२३ भरती –

पदाचे नाव – सपोर्ट ऑफिसर

पदांची संख्या – एकूण जागा नऊ

वयोमर्यादा – कमाल ६० वर्षापर्यंत वर्षे आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २३ आहे.

पगार – या पदांसाठी श्रेणीनुसार ४० ते ४५ हजार रुपये दरमहा असा पगार असेल.

हेही वाचा- लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती, अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे पात्रता निकष आणि भरती प्रक्रिया जाणून घ्या

अर्ज फी –

या भरतीसाठी अर्ज करताना कोणतीही फी आकारली जाणार नाही.

कार्यकाळ –

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एका वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्त केलं जाईल. नंतर हा कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता

अर्जदार एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी असल्यानं त्यांना कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. CMPOC मध्ये या पूर्वी काम केलेल्या, सीएमपीओसीच्या ऑपरेशनचं पुरेसं ज्ञान, कामाचं चांगला ट्रॅक रेकॉर्ड, सिस्टीम्स आणि प्रक्रियांचं योग्य ज्ञान असलेल्या माजी अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया –

सपोर्ट ऑफिसर पदासाठी शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अधिकच्या माहितीसाठी SBI च्या अधिकृत बेवसाईटा अवश्य भेट द्या.