SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयने (SBI) ने १५११ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीच्या अर्जप्रक्रियेला १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२४ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. पण आता मुदतवाढ देत ही तारीख आता १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे, त्यामुळे या भरतीसाठी उमेदवार १४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. लेखी परीक्षा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही निवड केली जाईल. पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एसबीआयकडून जारी केलेली अधिसूचना नीट वाचून घ्यावी.

SBI SCO रिक्त जागा आणि तपशील (SBI Bank Recruitment 2024 Notification)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडरसाठी १५११ रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्याद्वारे विविध विभागांमध्ये डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) नियुक्ती केली जाईल.

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?

पदनाम रिक्त जागा (Sarkari Naukri SBI Recruitment 2024)

रिक्त पदपदसंख्या
१) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations४१२
2) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery१८७
३) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations८०
४) डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect२७
५) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security०७
६) असिस्टंट मॅनेजर (System)७९८
एकूण रिक्त पदांची संख्या१५११

शैक्षणिक पात्रता (SBI Bank Recruitment 2024 Qualification)

उमेदवार विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये B.Tech/BE/MCA/M असणे आवश्यक आहे. तसेच Tech/MS.c पदवी असणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत अधिसूचना नीट वाचावी,

Read More Todays Trending News : “आता कुठेयत रेल्वे पोलीस अन् टीटी?” व्यक्तीने बांबूने भराभर तोडल्या ट्रेनच्या काचा अन्…; Video पाहून संतापले युजर्स

वयोमर्यादा ( SBI Bank Recruitment 2024 Age Limit)

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २१/२५ वर्षे आणि कमाल ३०/३५ वर्षे असावे.

पगार (SBI Bank Recruitment 2024 Salary)

डेप्युटी मॅनेजर पदासाठीच्या उमेदवारांना दरमहा रुपये ६४८२०-९३९६०/- वेतन दिले जाईल. तर असिस्टंट मॅनेजरला मूळ वेतन ४८४८०-८५९२०/- रुपये दिले जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर प्रकारचे भत्तेही दिले जातील.

अर्ज फी (SBI Bank Recruitment 2024 Application Form Fee)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ७५० रुपये भरावे लागतील. तर SC/ST/PWBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

WWW. SBI.CO.IN

एसबीआय बँकेतील भरती प्रक्रियेसंदर्भातील पीटीएफ

sbi.co.in/documents