Premium

Railway Recruitment 2023: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागामध्ये होतेय ‘या’ जागांसाठी भरती; २२ जूनपर्यंत करा अर्ज

एसीईसीआरच्या भरतीसाठीचे ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला २३ मे रोजी सुरुवात झाली आहे.

secr recruitment 2023
एसईसीआप भरती २०२३ (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

SECR Recruitment 2023: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) द्वारे मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे विभागामध्ये काम करायची इच्छा बाळगणारे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहे. https://secr.indianrailways.gov.in/ या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत. त्याशिवाय वेबसाइटवर भरतीसंबंधित सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. २३ मे रोजी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसीईसीआरमध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदाच्या एकूण १०३३ जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ असेल असे भरतीसंबंधित सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे. नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी संंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामाचा अनुभव तसेच विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या भरतीसाठीची वयोमर्यादा १८-२४ वयवर्ष इतकी आहे. तसेच मागास वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंतची सूट दिली जाईल. नोकरीच्या ठिकाणाबाबतची माहिती वेबसाइटवरुन मिळवता येईल.

शैक्षणिक पात्रता –

  • किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण

आणखी वाचा – उद्या एमपीएससीची पूर्व परीक्षा; ११ हजार उमेदवार, काय आहे तयारी?

भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर Merit List द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच प्रचलित नियमांनुसार वेतन दिले जाईल. २२ जून २०२३ नंतर भरतीसाठी केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. एसीईसीआर भरतीबाबत अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही वेबसाइटची मदत घेऊ शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Secr recruitment 2023 south east central railway department bharti for 1033 apprentice posts 22 june is last date to apply know more details yps