SEBI Recruitment 2024 : तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेबीने असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरतीची सूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाच्या वेगवेगळ्या ९२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवार ३० जून २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ…

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

१) असिस्टंट मॅनेजर (General) – ६२
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA

२) असिस्टंट मॅनेजर (Legal) – ५
विधी पदवी (LLB)

३) असिस्टंट मॅनेजर (IT) – २४
कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)

४) असिस्टंट मॅनेजर (Research) – २
पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)

५) असिस्टंट मॅनेजर (Official Language) – २
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

६) असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) – २
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

RCFL MT Recruitment 2024: ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’मध्ये मेगाभरती सुरू; कसा कराल अर्ज? फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

वयोमर्यादा

सेबीच्या या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांची कमाल वयोमर्यादा ३१ मार्च २०२४ पर्यंत १८ ते ३० वर्षे असावी लागणार आहे. यात एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज फी

खुला/ ओबीसी/ EWS – १११८ रुपये.

मागासवर्गीय/ ST/PWD – ११८ रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट
https://spphyderabad.spmcil.com/en/Interface/Home.aspx/

सेबीमधील रिक्त जागांवर भरतीसाठीच्या महत्त्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२४

Phase I परीक्षा – २७ जुलै २०२४

Phase II परीक्षा: ३१ ऑगस्ट आणि १४ सप्टेंबर २०२४

भरतीसाठी संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी लिंक

https://www.sebi.gov.in//

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक

Securities and Exchange Board of India