सध्याच्या काळ हा डिजिटल युगाचा आहे. त्यामुळे सध्याची पिढी समाजमाध्यमांवर खूप सक्रीय असते. समाजमाध्यमावर सक्रीय असणे हे चुकीचे नाही. परंतु, त्याचा सजगपणे वापर होणे महत्त्वाचे आहे. जर तो तुम्ही केला नाही. तर, तुम्ही फक्त प्रेक्षक होऊ शकतात, त्यातून तुम्ही काही बनवू (क्रिएट) शकणार नाही. येणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे एक तर्कशास्त्र (लॉजीक) घेऊन येत असते. ते तर्क समजून घेतले पाहिजे. या क्षेत्रात करिअर करताना तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेतला पाहिजे.

या क्षेत्रात आपल्याकडे असणारी पुरेशी माहिती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करिअरची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी, त्याला डिजिटल स्पर्श असणार आहे. तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील तुम्हाला डिजिटल क्षेत्राचा वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : नर्सिंग डिप्लोमा करण्याची संधी

या क्षेत्रात काम करताना, विविध भाषांवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज अनेक मंडळी आहेत की, ज्यांच्या स्वत:च्या यूट्यूब वाहिन्या आहेत, त्यामार्फत त्यांचा रोजगार सुरू आहे. तसेच ते इतरांनाही नोकऱ्या देत आहेत. या क्षेत्रात काम करताना, तुमच्यातील सर्जनशीलतेकडे विशेष लक्ष दिले जाते, त्यामुळे प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी गुगलचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. परंतु, त्याआधी त्याचा पाया समजून घेणे गरजेचे आहे. डिजिटल क्षेत्र हे खूप मोठे आहे, यात कंटेन्ट क्रिएटर, ग्राफिक डिझाईनर, रिसर्चरस्, व्हिडीओ एडिटर अशा विविध नोकऱ्या यामध्ये उपलब्ध होत असतात. परंतु, या क्षेत्रात काम करताना, सर्तक रहावे लागते. तुम्ही अशा डिजिटल पिढीत आहात की, तुमच्याकडे मार्केट म्हणून एक मर्यादित शहर नाहीये, डिजिटल माध्यमाद्वारे तुम्ही तुमचे काम इतर ठिकाणी देखील पोहचवू शकता. जर तुम्हाला डिजिटल क्षेत्रात करिअर करायचे असेल तर, या सर्व गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत.

प्रेक्षक आणि ग्राहक यापलिकडे जाणे गरजेचे आहे. एखाद्या संस्थेत तुम्ही काम करत असाल, परंतु, तुम्हाला डिजिटल जगाची म्हणजेच संगणक, प्रोग्रामिंग भाषा आणि डेटा विश्लेषण (डेटा अनालिटिक्स) यांची माहिती नसेल किंवा वापरण्याचा अनुभव नसेल. तर, तुमची वेगाने प्रगती होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे सध्याच्या काळात डिजिटल क्षेत्राला नाकारू नका. ते माध्यम समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मुख्य प्रायोजक : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर : युनियन बँक ऑफ इंडिया

●पॉवर्ड बाय : ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com