solapur farmer’s Success Story : आपला देश कृषी प्रधान देश आहे . भारतात जास्तीत जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून व्यवसाय किंवा नोकरी करता. कधी पिकवलेल्या पिकांपासून शेतकऱ्यांचा फायदा होतो तर कधी तोटा होतो तरीसुद्धा हार न मानता शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसतात. (solapur farmer Cultivated coriander in sugarcane farm and earned 50 thousand rupees in just 3 days)

सध्या कोथिंबीरचे भाव वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या एका शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी सुद्धा ठरला. या शेतकऱ्याने त्याच्या ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली आणि फक्त तीन दिवसामध्ये ५० हजार रुपयांची कमाई केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या या शेतकऱ्याची आणि त्याच्या या नवीन प्रयोगाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : मोजे विकतो म्हणून लोकांनी मारले टोमणे, पण जिद्दीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय; वाचा कोट्यधीश कपिल गर्ग यांचा संघर्षमय प्रवास

सोलापूरच्कोया शेतकऱ्याने कोणता नवीन प्रयोग केला?

सध्या कोथिंबीरचे दर बाजारात चांगलेच वाढले आहेत. कोथिंबीरची एक पेंढी ५० ते ६० रुपयांना विकली जात आहे. हे पाहून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या हराडवाडी गावामध्ये राहणाऱ्या शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून ३० ते ३५ किलो धने लावून कोथिंबीरची लागवड केली . त्यानंतर त्यांनी बाजारात जाऊन स्वत: एक पेंडी ५० ते ६० रूपयांना विकली. यातून त्यांनी फक्त तीन दिवसांमध्ये ५० हजार रुपयांची कमाई केली.

हेही वाचा : लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; वाचा वर्षाला कोटींची उलाढाल करणाऱ्या हर्षित गोधा यांची यशोगाथा

उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड करताना अडचणी येतात. लक्ष्मण यांनी लागवड करताना ही बाब लक्षात घेऊन पाईपद्वारे या कोथिंबिरीला पाणी दिल. त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांच्या कोथिंबिरीला पाणी पडत राहिल्याने पीक चांगले आल्याचे ते म्हणाले. शेतकरी लक्ष्मण शेळके यांच्या मते, कोथिंबीरचा हाच भाव कायम राहिला तर कोथींबीर विक्री पासून १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

शेतकरी लक्ष्मण शेळके यांच्या प्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात कोथिंबीरची लागवड करू शकता आणि भरघोस नफा मिळवू शकता.