SECR Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ७३३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रकिया सुरू आहे. जर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची इच्छा असेल तर आजच अर्ज करा. हा अर्ज कसा भरायचा, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता किती, आणि अर्ज कसा करायचा, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

पदसंख्या – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ७३३ रिक्त जागा आहे.

शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी

वयोमर्यादा – पात्र उमेदवाराची वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे आहेत.

नोकरी ठिकाण – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती नागपूर शहरात आहे.

हेही वाचा : RTMNU Nagpur Bharti 2024 : नागपूर विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी! ९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

अर्ज पद्धती – या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांनी १२ एप्रिल २०२४ या पूर्वी अर्ज करावा. ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट – या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे.

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी या पदाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/12TZRSR8xcKo6umtuq0_1-xouIdZB2eMI/edit या लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी.

अर्ज कसा भरावा?

  • https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action National Apprenticeship Training Scheme (NATS) या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करताना सुरुवातीला अधिसुचना नीट वाचावी. शैक्षणिक पात्रता, पदसंख्या आणि वेतनविषयी माहिती जाणून घ्यावी.
  • अर्जात विचारलेली माहिती नीट भरावी.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा.