सिक्युरिटी प्रिटींग अँड मिटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( SPMCIL) (भारत सरकारची पूर्ण मालकीची कंपनी) असिस्टंट मॅनेजर, आणि डेप्युटी मॅनेजर पदांची भरती.
एकूण रिक्त पदे – २४.
रिक्त पदांचा तपशिल –
(१) डेप्युटी मॅनेजर (आयटी) – ॲप्लिकेशन डेव्हलपर – १ पद (खुला).
पात्रता – (दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी) किमान ६०% गुणांसह फर्स्ट क्लास पूर्ण वेळ बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग) आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(२) असिस्टंट मॅनेजर (एचआर) – ४ पदे (अज – १, इमाव – १, खुला – २).
पात्रता – पर्सोनेल मॅनेजमेंट अँड इंड्ट्रिरयल रिलेशन्स/ एमएसडब्ल्यू/एमबीए (एचआर) विषयातील फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री.
(३) असिस्टंट मॅनेजर (एफ अँड ए) – ९ (अजा – १, अज – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता – बी.कॉम. आणि सी.ए./आयसीडब्ल्यूए.
(४) असिस्टंट मॅनेजर (मटेरियल मॅनेजमेंट) – ४ पदे (अज – १, खुला – ३).
पात्रता – मेकॅनिकल/ इले्ट्रिरकल/पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स/ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील इंजिनीअरिंग पदवी आणि एमबीए (मटेरियल मॅनेजमेंट / स्टोअर्स मॅनेजमेंट / पर्चेस / ऑपरेशन्स मॅनेजमेंट / सप्लाय चेन मॅनेजमेंट/ लॉजिस्टिक्स विषयातील २ वर्षं कालावधीची पदवी/पदव्युत्तर पदविका).
(५) असिस्टंट मॅनेजर (आयटी) – २ पदे (इमाव – १, खुला – १).
पात्रता – फर्स्ट क्लास एमसीए/बी.टेक. (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/आयटी).
(६) असिस्टंट मॅनेजर (ओएल) – १ पद (इमाव).
पात्रता – हिंदी किंवा इंग्रजी विषयातील फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री (पदवी स्तरावर इंग्लिश/हिंदी विषय अभ्यासलेले असावेत.) आणि हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी भाषांतर कामाचा २ वर्षांचा अनुभव.
इष्ट पात्रता – संस्कृत भाषेचे आणि/किंवा आधुनिक भारतीय भाषेचे ज्ञान आणि संगणकावरील प्राविण्य.
(७) असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – ३ पदे (अजा – १, खुला – २).
पात्रता – इंजिनीअरिंग पदवी आणि फॅक्टरीमधील सुपरवायझरी कामाचा २ वर्षांचा अनुभव
किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री विषयातील पदवी आणि फॅक्टरीमधील सुपरवायझरी कामाचा ५ वर्षांचा अनुभव किंवा कोणत्याही विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि फॅक्टरीमधील सुपरवायझरी कामाचा किंवा ट्रेनिंग, एज्युकेशन, कन्सल्टन्सी किंवा रिसर्च कामाचा ६ वर्षांचा अनुभव आणि इंड्ट्रिरयल सेफ्टीमधील डिप्लोमा किंवा डिग्री.
वयोमर्यादा – (दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी) असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३० वर्षे, डेप्युटी मॅनेजर पदासाठी ३५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट (७५% वेटेज) आणि इंटरह्यू (२५% वेटेज). ऑनलाइन टेस्टमध्ये
(१) प्रोफेशनल नॉलेज – ६० प्रश्न, ९० गुण; (२) जनरल अवेअरनेस; (३) इंग्लिश लँग्वेज; (४) लॉजिकल रिझनिंग; (५) कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड
(२ ते ५ साठी प्रत्येकी १५ प्रश्न, १५ गुण) एकूण १२० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे. ऑनलाइन टेस्टमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १/४ प्रमाणात उमेदवार इंटरह्यूकरिता निवडले जातील.
परीक्षा केंद्र – मुंबई/भोपाळ/ हैद्राबाद/दिल्ली अँड एनसीआर/कोलकता.
अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- (अजा/अज/ अपंग उमेदवारांसाठी रु. २००/-.)
ऑनलाइन मोड. ऑनलाइन अर्ज कसा करावा व त्यासोबत कोणती कागदपत्रं अपलोड करावीत याची विस्तृत
माहिती वेबसाईटवरील जाहिरातीमधील पॅरा-५ मध्ये उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज www.spmcil.com या संकेतस्थळावर २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत करावेत.
