स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), (मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स अंतर्गत एक स्वायत्त संस्था), नवी दिल्ली. ग्रुप-बी मधील ३२३ ‘असिस्टंट कोचेस’ पदांच्या थेट भरतीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीमध्ये आंशिक बदल २५ मार्च २०२६ च्या अडेंडमनुसार केले आहेत. यानुसार अपंग उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख बदलून दि. २१ एप्रिल २०२६ करण्यात आली आहे.
डिसिप्लीननुसार रिक्त पदे
खेळाचा प्रकार असिस्टंट कोच
- (१) आर्चरी – १२
- (२) ॲथलॅटिक्स – २८
- (३) बॉक्सिंग – १९
- (४) फिल्ड हॉकी – १३
- (५) शूटिंग – २८
- (६) वेट लिफ्टींग – १
- (७) रेसलिंग – २२
- (८) सायकलिंग – १२
- (९) फेन्सिंग – ११
- (१०) ज्युडो – ६
- (११) रोविंग – ११
- (१२) स्विमींग – २६
- (१३) टेबल टेनिस – १४
- (१४) बास्केटबॉल – १२
- (१५) फूटबॉल – १२
- (१६) जिम्नॅस्टिक्स – १२
- (१७) हँडबॉल – ६
- (१८) कबड्डी – ६
- (१९) टेनिस – ८
- (२०) Canoeing – ७
- (२१) Sepak Takraw – ३
- (२२) खोखो – २
- (२३) तायक्वांदो – ११
- (२४) व्हॉलिबॉल – १०
- (२५) वूशु (Wushu) – ६
- (२६) बॅडमिंटन – १६
महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू आहे.
पात्रता
- (i) SAI, NS-NIS किंवा इतर मान्यताप्राप्त विद्यापीठामधील डिप्लोमा इन कोचिंग किंवा (२) ऑलॅम्पिक/पॅरा ऑलिम्पिक /एशियन गेम्स/वर्ड चॅम्पियनशिप पार्टिसिपेशन आणि कोचिंगमधील कोर्स सर्टिफिकेट किंवा (३) द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
- (ii) वयोमर्यादा – ( २७ जानेवारी २०२६ रोजी) ३० वर्षेपर्यंत. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे) १ वर्ष कालावधीची करार पद्धतीने संबंधित क्षेत्रातील SAI मधील सलग सेवा दिलेले उमेदवार (खेलो इंडिया, TOPS आणि ANSF मध्ये सहभाग दिलेले) यांना वयोमर्यादेत अतिरिक्त ५ वर्षांची सूट दिली जाईल.
- (iii) वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ६ रु. ३५,४००/- – रु. १,१२,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ७०,०००/-.
कामाचे ठिकाण – देशभरातील SAI चे रिजनल सेंटर्स/नॅशनल स्कूल ऑफ एक्सलन्सेस/ट्रेनिंग सेंटर्स.
प्रमोशन्स – असिस्टंट कोचेस पदावरील उमेदवारांना ग्रुप-ए (कोच, सिनियर कोच, चिफ कोच इ.) पदांवर प्रमोशनची संधी उपलब्ध असेल.
निवड पद्धती
पात्र ठरलेल्या उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड् टेस्टसाठी बोलाविले जाईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० प्रश्न प्रत्येकी १ गुणासाठी असे १०० गुण, वेळ २ तास. यात (१) स्पोर्ट्सविषयी ज्ञान – ६५ गुण, (२) स्पोर्ट्स सायन्स – २५ गुण आणि (३) जनरल अवेअरनेस, रिझनिंग, अॅप्टिट्यूड – १० गुण यांचा समावेश असेल.
चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. CBT मधून रिक्त पदांच्या १ë३ प्रमाणात उमेदवार कोचिंग अॅबिलिटी टेस्ट (CAT) साठी निवडले जातील. CAT साठी निवडीचे ४० निकष जाहिरातीमधील Annexure-२ मध्ये उपलब्ध आहेत. नेमणूकीपूर्वी वैद्यकिय तपासणी केली जाईल.
- परीक्षा केंद्र – मुंबई, गांधीनगर, बेंगलुरू, हैद्राबाद इ.
- अर्जाचे शुल्क – खुला/इमाव/इडब्ल्यूएसचे पुरुष उमेदवार – रु. २,५००/-; अजा/अज/मा.सै./महिला – रु. २,०००/-. (ऑनलाइन मोड NEFT/RTGS/Net Banking/UPI) याशिवाय उमेदवारांना जीएसटी आणि बँकींग चार्जेस भरावे लागतील.
अंतिम निवड यादी बनविताना CBT मधील गुणांना ४० टक्के वेटेज आणि CAT मधील गुणांना ६० टक्के वेटेज दिले जाईल. ऑनलाइन अर्ज http://www.sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळावर २१ एप्रिल २०२६ (सायंकाळी ५ वाजे)पर्यंत करावेत.
