सशस्त्र सीमा बल (SSB), गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक निम लष्करी दल – ५१ सब-इन्स्पेक्टर पदांची भरती.

(१) सब-इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ७).

पात्रता – (अ) १२ वी उत्तीर्ण, (ब) जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा, (क) नर्सिंग काऊन्सिलकडे नोंदणी.

(२) सब-इन्स्पेक्टर (पायोनियर) – २१ पदे

(अजा – ३, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – १२).

पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी.

(३) सब-इन्स्पेक्टर (कम्युनिकेशन) – २० पदे (अजा – ५, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९).

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअनिंग पदवी किंवा बी.एससी. (फिजिक्स /केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स).

एकूण रिक्त पदांपैकी १०%पदे माजी सैनिकांसाठी राखीव.

वयोमर्यादा –

(१९ एप्रिल २०२६ रोजी)
सर्व पदांसाठी ३० वर्षेपर्यंत.

वेतन श्रेणी – सर्व पदांसाठी

पे-लेव्हल – ६ – मूळ वेतन (रु. ३५,४००/-) अंदाजे

वेतन दरमहा रु. ७१,०००/-.

(८ वा केंद्रीय वेतन आयोग लागू झाल्यावर किमान रु. ८६,०००/- दरमहा.) उमेदवारांना नविन पेन्शन स्कीम लागू असेल.

निवड पद्धती – शारीरिक क्षमता चाचणी

( ढएळ) आणि शारीरिक मापदंड चाचणी (ढरळ)

अर्जाचे शुल्क – रु. २००/-.

ऑनलाइन अर्ज https://recruitment.ssb.gov.in आणि https://ssb.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १९ एप्रिल २०२६ पर्यंत करावेत.

‘एनएसडी’ प्रवेश परीक्षा

अभिनयात करिअर करण्यास इच्छुकांसाठी देशातील मुख्य नाट्य प्रशिक्षण संस्था ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) १५ जुलै २०२६ पासून सुरू होणार्‍या (पूर्णकालिक) पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ घेणार आहे.

(१) नाट्यशास्त्रातील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम २०२६-२९, नवी दिल्ली – प्रवेश क्षमता – ३२. यात उमेदवारांना ॲक्टिंग, डिझाइन, दिग्दर्शन आणि नाट्यक्षेत्राशी निगडीत इतर डिसिप्लिनमध्ये प्रोफेशनल बनविले जाते. हा कोर्स पूर्णवेळ निवासी आहे.

(२) अभिनयातील एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०२६-२९, बंगलुरू, कर्नाटक – अभिनय क्षेत्रातील प्रोफेशनल/रिसोर्स पर्सन बनविण्यासाठी उमेदवारांना प्रशिक्षित केले जाते.

(३) इंडियन क्लासिकल थिएटर यामध्ये एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०२६-२७ वाराणसी, उत्तर प्रदेश.

(४) एक वर्षाचा नाट्यकला प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०२६-२७, गंगटोक, सिक्कीम.

(५) थिएटर इन एज्युकेशन एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०२६-२७, आगरताळा, त्रिपुरा.

वयोमर्यादा – ( १ जुलै २०२६ रोजी) १८-३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे).

पात्रता – सर्व कोर्सेससाठी पदवी उत्तीर्ण आणि ३ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी किमान ६ नाट्यनिर्मितीत भाग घेतलेला असावा. इतर १ वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी किमान ४ नाट्यनिर्मितीत भाग घेतलेला असावा. (याचा पुरावा म्हणून उमेदवारांना सहभागाचे प्रमाणपत्र, ब्रोशर, वर्तमानपत्रातील क्लिप्स इ. सादर कराव्या लागतील.)

प्रशिक्षणाचे माध्यम – सर्व कोर्सेसमध्ये सूचना हिंदी/इंग्रजी भाषेत दिल्या जातील. बंगळुरू येथील कोर्सेससाठी सूचना कन्नड/इंग्रजी/ हिंदी भाषेत दिल्या जातील. सिक्कीम सेंटरमधील कोर्ससाठी उमेदवारांना तेथील मातृभाषा अवगत असावी.

आर्थिक मदत – तीन वर्षांच्या कोर्समधील उमेदवारांना शैक्षणिक आणि इतर संबंधित खर्चासाठी स्कॉलरशिप दरमहा रु. ९,५००/- दिले जातील.

१ वर्षाच्या कोर्समधील उमेदवारांना दरमहा रु. ६,०००/- दिले जातील.

निवड पद्धती –

दोन टप्प्यांची प्रक्रिया

१) पूर्व परीक्षा /ऑडिशन. (२) अंतिम परीक्षा / वर्कशॉप.

अर्जाचे शुल्क – रु. ५०/-

परीक्षा केंद्र – पूर्वपरीक्षा मे आणि जून २०२६ मध्ये घेतली जाईल. दि. १६ मे २०२६ रोजी बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद; दि. १६ मे २०२६ रोजी पुणे, भोपाळ, अहमदाबाद; दि. ३१ मे ते २ जून २०२६ दरम्यान दिल्ली इ. १८ केंद्रांवर घेतली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज ६६६. http://www.nsd.gov.in किंवा http:// http://www.onlineadmission.nsd.gov.in या संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकमधून दि. १७ एप्रिल २०२६ पर्यंत करावेत.