scorecardresearch

Premium

Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल आज! कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Maharashtra SSC Board Result 2023 Declared Tomorrow : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra 10th Result 2023 Tomorrow How and Where to check
महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल २०२३ तारीख आणि वेळ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra 10th Result 2023 Declared Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट (Official website to check 10th result)

१) http://www.mahresult.nic.in

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

२) http://sscresult.mkcl.org

३) https://ssc.mahresults.org.in

SSC Result 2023 : असा पहा १०वी चा निकाल ( SSC Result 2023: How to check 10th Result)

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.

२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)

४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

५) निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या मार्कशीटमध्ये विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी, पात्रता स्थिती यांचा समावेश असेल. जे विद्यार्थी महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले त्यांना पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.

हे ही वाचा<< Maharashtra Board SSC 10th Result 2023 Live Updates: दहावीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×