Success Story: आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जगत असते, पण प्रत्येक व्यक्ती स्वप्न पूर्ण करेलच असं नाही. काही जण अथक प्रयत्न करून जिद्दीनं आपलं स्वप्न साकारण्यात यशस्वी होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय, परिस्थिती पाहिली जात नाही. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी गरीब परिस्थितीतून आपलं स्वप्न पूर्ण केलं. सोलापूर येथील IAS रमेश घोलप हे एका गरीब कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. परंतु, अनेक संकटांवर मात करून त्यांनी भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक UPSC उत्तीर्ण केली आणि AIR २८७ मिळवले.

रमेश घोलप यांचे बालपण

IAS रमेश घोलप यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे वडील गोरख घोलप सायकल दुरुस्त करायचे. पण, एके दिवशी मद्यपानाच्या व्यसनामुळे त्यांची तब्येत बिघडली आणि रमेश लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर रमेश यांच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आजूबाजूच्या गावात बांगड्या विकायला सुरुवात केली. बांगड्या विकण्यासाठी रमेश देखील आईची मदत करू लागले. प्रतिकूल परिस्थिती असूनही रमेश यांना नेहमी जास्त शिक्षण घेण्याची इच्छा होती. ते पुढचे शिक्षण घेण्यासाठी आपल्या काकांसह बार्शीला गेले.

Success Story Of Abhishek Bakolia In Marathi
Success Story Of Abhishek Bakolia : UPSC टॉपर अपाला मिश्राने निवडला तिचा जोडीदार, वाचा कोण आहे अभिषेक बकोलिया
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Art and Culture with Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

रमेश अभ्यासात टॉपर होते, पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना बीएडचा डिप्लोमा घ्यावा लागला. २००९ मध्ये त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यावेळी तहसीलदारांशी झालेल्या संवादामुळे त्यांना आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली. जिद्द आणि आईच्या पाठिंब्याने त्यांनी नोकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली.

हेही वाचा: Success Story : एकेकाळी नोकरीसाठी मिळाला नकार; जिद्दीने उभी केली स्वतःची कंपनी अन् उभारला हजारो कोटींचा व्यवसाय

कोचिंगशिवाय मिळवले यश

प्रतिकूल परिस्थितीमुळे रमेश यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC ची तयारी सुरू केली. परंतु, ते पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाले; तरी त्यांनी हार मानली नाही. २०१२ मध्ये त्यांनी UPSC परीक्षा २८७ व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली आणि IAS बनले.

Story img Loader