Success Story: व्यवसाय सुरू करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. काही जण स्वतःच्या हुशारीमुळे किंवा परिस्थितीमुळे कमी वयातच स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, तर काही जण ६० वर्षांच्या वयातही व्यवसाय सुरू करतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ धैर्य आणि आवड आवश्यक आहे. बिहारमधील एका तरुणानेही वयाच्या १७ व्या वर्षी मशरूम शेती सुरू केली. आज तो २१ वर्षांचा आहे आणि दरवर्षी १२००० किलो बटण मशरूम पिकवून तो लाखो रुपये कमवत आहे.

अभ्यासात रस नव्हता म्हणून सुरू केला व्यवसाय

प्रभु रंजनला अभ्यासात अजिबात रस नव्हता. दहावीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला उच्च शिक्षण घेणे आणि नोकरी मिळवणे खूप कठीण वाटू लागले, त्यामुळे त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. पण, तो व्यवसाय असा असावा ज्यात कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळेल. बऱ्याच संशोधनानंतर त्याने मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला.

प्रभुने घरापासूनच मशरूम शेती सुरू केली. त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा गहू आणि भाताची लागवड करतात, म्हणून त्याने मशरूम लागवडीसाठी भाताचे गवत आणि गव्हाचा पेंढा वापरले. यामुळे त्याची गुंतवणूक कमी झाली. प्रभुने बांबूचा वापर करून घरी रॅक बनवले आणि त्यात पेंढा भरला. त्याने एका पुरवठादाराकडून ५,००० रुपयांचे स्पॉन खरेदी केले. यातून त्याने २०० बॅग बटण मशरूम लावले. ३० दिवसांनी मशरूमचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर त्याने मशरूमची कापणी सुरू केली. त्याने हे मशरूम स्थानिक बाजारात विकले, यातून त्याला ४५,००० रुपये मिळाले.

तीन वर्षांचा अनुभव

प्रभूने तीन वर्षे फक्त हंगामी मशरूमची लागवड केली, कारण त्याला अधिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायची होती. त्याने २०२३ पर्यंत पहिल्या तीन वर्षांत फक्त २०० पिशव्या ठेवल्या, यामुळे त्याला प्रत्येक हंगामात ५० हजार रुपये मिळाले.

त्यानंतर २०२४ मध्ये त्यानी १८x४० फूट आकाराचे एअर कंडिशनिंग युनिट सुरू केले. त्यात एका वेळी २५०० पिशव्या ठेवता येतात. आता तो दिल्लीहून ऑनलाइन स्पॉन ऑर्डर करतो. तसेच तो पाईप पद्धतीने मशरूमच्या पिशव्यांसाठी कंपोस्ट बनवतो, यामुळे त्याचा खर्च बराच कमी होतो आणि हे कंपोस्ट मशरूमसाठी खूप चांगले मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वार्षिक उत्पन्न १८ लाख

कोल्ड युनिटच्या मदतीने प्रभु रंजन वर्षातून चार वेळा मशरूम काढू शकतो. तो दरवर्षी १२ हजार किलो मशरूम विकतो. हे विकून तो १८ लाख रुपयांचा व्यवसाय करतो. म्हणजेच त्याचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपये झाले आहे. सर्व खर्च वजा केल्यानंतर तो दरवर्षी १० लाख रुपयांचा नफा कमावतो.