Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. आयुष्यातील अनेक संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करतात. पण, बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण तरीही खचून न जाता काही जण परीक्षा उत्तीर्ण करतात.

राम भजन कुम्हार यांचा एका छोट्या गावातून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पद मिळवण्यापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ते राजस्थानमधील बापी या खेडेगावातील आहेत. घरच्या गरीब परिस्थितीमुळे राम भजन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांच्याकडे राहण्यासाठी गावात चांगले घरदेखील नव्हते. अशा खडतर आयुष्यावर मात करून त्यांंनी आपल्या गावाचे आणि कुटुंबाचे नाव मोठे केले आहे.

Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
MPSC Results of over 15000 students delayed |
‘एमपीएससी’: ‘या’ पंधरा हजारांवर विद्यार्थ्यांचा निकाल रखडला..काय आहे कारण?
career advice from ips officer siddharth bhange for youth
माझी स्पर्धा परीक्षा : कमी वयात संधीचे सोने
Sharad Pawar tweet, Sharad Pawar,
Sharad Pawar : शरद पवार पक्षाला सावरू शकतील का? विधानसभेनंतर राष्ट्रवादीसमोर (शरद पवार) आव्हानांचा डोंगर
Success Story Of Anumula Jithendar Reddy
Success Story Of Anumula Jithendar Reddy : IIT चं घेतलं शिक्षण, पण कॉर्पोरेटमध्ये नोकरी न करता निवडला अनोखा मार्ग; वाचा, अनुमुला जितेंद्र रेड्डीचा प्रवास
Numerology
अतिशय बुद्धिमान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, नोकरी की व्यवसाय, कुठे मिळू शकते यांना भरपूर यश?

आपली परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी त्यांच्या यशाच्या प्रवासातील अनेक अडथळ्यांवर मात करून UPSC परीक्षेत ६६७ वा क्रमांक पटकावला. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अगदी आव्हानात्मक परिस्थितीवरही विजय मिळवता येतो हे राम भजन यांनी दाखवून दिलं.

एकेकाळी राम भजन रोजंदारीवर काम करायचे

राम भजन यांच्या वडिलांचे निधन झाले होते. काम करण्याचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे राम भजन आणि त्यांची आई गावामध्ये रोजंदारी कामगार म्हणून काम करू लागले. या कामात त्यांना दगड फोडावे लागत होते, या कामात त्यांची आईदेखील खूप कष्ट करायची. त्यांना दररोज २५ कार्टून दगड फोडावे लागायचे ज्यातून त्यांना दररोज ५ ते १० रुपये मिळायचे. या पैशांतून त्यांचे एकवेळचे जेवण व्हायचे. अशी कठीण परिस्थिती असूनही त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा: Success Story: भारतातील अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील ‘या’ व्यक्तीच्या नावाचा समावेश; १९२ वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

२००९ मध्ये त्यांनी पोलिस दलात हवालदार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांची पहिली पोस्टिंग सीपी रिझर्व्हमधील विजय घाट येथे होती, त्यानंतर त्यांची बदली शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात झाली. नोकरी असूनही त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आणि २०११ मध्ये त्यांनी आठव्या प्रयत्नात ६६७ वा क्रमांक मिळवला.

Story img Loader