Success Story: कल्याणी आणि दिनेश या इंजिनिअर जोडप्याने बाजरीचे उत्पादन घरोघरी परत आणण्याचे काम केले. २०१० मध्ये या जोडप्याने अर्थ ३६० नावाच्या उपक्रमाची पायाभरणी केली. ते रेडी-टू-कुक आणि रेडी-टू-ईट प्रोडक्‍ट्स उत्पादनांसह बाजरी लोकप्रिय करत आहेत. या उपक्रमाने दक्षिण भारतात बाजरीआधारित ५० उद्योग स्थापन केले आहेत आणि १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बाजरी लागवड करण्यास मदत केली आहे. अर्थ ३६०ने गेल्या आर्थिक वर्षात २.०५ कोटी रुपयांची उलाढाल केली.

कल्याणी आणि दिनेश आंध्र प्रदेशातील अनंतपूरपासून ९२ किमी अंतरावर असलेल्या कादिरी येथे राहतात. कल्याणीचे पती दिनेश यांनी २०१० मध्ये अर्थ ३६० इको व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. त्यांनी बाजरीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, एंटरप्राइझने तंत्रज्ञान विकास, उत्पादन, खरेदी, प्रक्रिया तसेच बाजरी आणि बाजरी उत्पादनांच्या विपणनाद्वारे बाजरीआधारित पुरवठा साखळी तयार केली.

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Success Story Of Krishna Arora In Marathi
Success Story: कोण आहे कृष्णा अरोरा? ज्याने २५ व्या वर्षी खरेदी केली स्वतःची करोडोंची कार; वाचा, ‘त्याची’ गोष्ट
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

कल्याणी आणि दिनेश यांच्या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना बाजरीची लागवड करण्यास मदत करणे, बाजरीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, बाजरीवर आधारित पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि बाजरीचे पीठ, डाळ, रवा आणि इतर खाद्यपदार्थ विकणे हे आहे. ते बाजरी अनेक प्रकारे विकतात. काही बाजरीवर आधारित उत्पादने बाजारात आणली जातात. फॉक्सटेल ‘पोंगल’ (खिचडी) आणि ‘बिसी बेले भात’ मिक्स, पॉप्ड ज्वारी आणि मल्टी बाजरी मिक्स (न्यूट्री मिक्स, रोटी मिक्स, डोसा मिक्स आणि खिचडी मिक्स) हे प्रमुख आहेत.

हेही वाचा: Success Story : भाड्याच्या घरातून सुरू केलं काम अन् उभारली तब्बल ८,४०० कोटींची संपत्ती

कल्याणी-दिनेश यांचे शिक्षण

कल्याणीने आंध्र प्रदेशातील पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून दिनेशने म्हैसूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीईचे शिक्षण घेतले आहे. ते तिंबक्तू कलेक्टिव्ह नावाच्या संस्थेत भेटले, जिथे दोघे काम करत होते. हल्लीच्या काळात लोक गहू, तांदळाचे दररोजच्या आहारात भरपूर सेवन करतात, ज्यामुळे हळूहळू बाजरीसारख्या धान्याचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. हे उत्पन्न अधिक वाढवण्यासाठी हे जोडपे कार्य करत आहे.

Story img Loader