Success Story: फरिदकोटच्या कोटकपुरा येथील एका वृद्ध भूमिहीन शेतकऱ्याने सुमारे १० एकर भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करून, केलेली हळदीची लागवड एका व्यवसायात बदलली आहे, मनजीत सिंग असे या व्यक्तीचे नाव असून, या व्यक्तीचे वय ५९ वर्षे आहे. भूमिहीन शेतकरी मनजीत सिंग यांनी आपल्या दृढनिश्चय, मेहनतीच्या जोरावर जमिनीचे प्रतिएकरी ८०,००० रुपये भाडे देऊन दरवर्षी चार लाख रुपये प्रतिएकरी कमावले आहेत. त्यांचे हे यश कृषी क्षेत्रातील कठोर परिश्रम आणि धोरणात्मक नियोजनाची शक्ती अधोरेखित करते.

पदवीधर आणि कुशल लघुलेखक असलेल्या मनजीत सिंह यांना त्यांच्या बालपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांच्या कुटुंबाकडे एकेकाळी २.५ एकर जमीन होती; परंतु त्यांच्या आईच्या दीर्घ आजारामुळे १९८० मध्ये नाइलाजाने त्यांना ती जमीन विकावी लागली. पुढे मनजीत सिंह यांनी पंजाब कृषी विद्यापीठासोबत (PAU) कापूस आणि बासमतीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) प्रकल्पांवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी नंतर बहुराष्ट्रीय कीटकनाशक कंपन्यांमध्ये कामे स्वीकारली आणि अनमोल कृषी अनुभव मिळवला.

Most indebted farmers Punjab, Maharashtra
महाराष्ट्र नव्हे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे लिलाव, सर्व व्यवहार बंद
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Job Opportunities in Agriculture Sector Agri Food Technology Sector Production Capacity
मातीतलं करिअर: कृषी अन्नतंत्रज्ञान क्षेत्र
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee
आपल्याला काय हवे? सकस आहार, की दुर्धर आजार?

१९९० च्या दशकात मनजीत सिंह यांच्या जीवनात बदल झाला जेव्हा त्यांनी लहान जागा भाड्याने घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. २०१० पर्यंत ते हळद आणि इतर नगदी पिके घेण्यासाठी मोठे भूखंड भाडेतत्त्वावर घेऊन शेती करत होते.

सिंह हे त्यांच्या बहुतांश जमिनीवर देशी हळद आणि पंजाब कृषी विद्यापीठाने (PAU) विकसित केलेली पीएच-१ ही जात, ते स्वतः तयार केलेले बियाणे वापरून, दोन्हींची लागवड करतात. त्यांची हळद पावडर आंतरराष्ट्रीय ऑर्डरदेखील मिळवते आणि ही त्याच्या एंटरप्राईजची व्यापक पोहोच दर्शवते.

विस्तृत ज्ञान आणि अनुभवामुळे सिंह हे सहकारी शेतकऱ्यांसाठी एक विश्वासू सल्लागार बनले आहेत. त्यांना ‘खेती दा डॉक्टर’ (डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर), असे टोपणनाव मिळाले आहे. शेतकरी समाजाप्रति ते नेहमीच आपली बांधिलकी दर्शवतात.

हेही वाचा: Success Story: इंजिनीअरची नोकरी सोडून सुरू केली शेती; वर्षाला कमावतो लाखो रुपये

हे सर्व यश असूनही सिंह यांना भाडेकरू शेतकरी म्हणून अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. धोरणात्मक सुधारणांची गरज अधोरेखित करून, सिंह यांनी सरकारला भाडेकरू शेतकऱ्यांना ओळखण्याचे आवाहन केले, जे पंजाबच्या कृषी कर्मचाऱ्यांपैकी २०-३० टक्के आहेत. तसेच सिंह वैविध्यपूर्ण शेतीच्या महत्त्वावरही भर देतात.

सिंह सांगतात, “परिश्रम ही यशाची एकमेव गुरुकिल्ली आहे. मी शेतकऱ्यांना, उच्च गुणवत्तेची पिके तयार करण्यासाठी स्वतःला झोकून द्या आणि गहू व भातशेतीपासून मोठ्या प्रमाणात दूर जाऊन, नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करतो.

Story img Loader