Success Story: भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेकजण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेकजण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. मात्र दिल्लीतील आयुष गोयल यानं पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. आयुषनं यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी तब्बल २८ लाख रुपये पॅकेज असणारी नोकरी सोडली. तसेच शिक्षणासाठी २० लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. यानंतर आयुषनं परिक्षेची तयारी केली परिक्षा दिली आणि असा निकाल आला की सगळेच अवाक् झाले.

एमबीएनंतर २८ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी

यूपीएससी परीक्षेत १७१ रॅक मिळवणारा आयुष हा केरळमधील कोझीकोड आयआयएममधून एमबीआय झाला. त्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली, यामध्ये त्याला २८ लाख रुपयांचे पॅकेज होते. यामुळे त्याच्या शिक्षणासाठी घेतलेल्या २० लाख रुपये कर्जाची चिंता मिटली होती. परंतु नोकरी करुन सात महिनेच झाले असताना आयुषने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी वडिलांना चिंता वाटली पण त्यांना मुलगा आयुषवर विश्वास होता अन् तो विश्वास आयुषनं सार्थ करुन दाखवला.

हेही वाचा >> Success Story: १६ व्या वर्षी उत्तीर्ण केली AIIMS ची परीक्षा, तर २२ व्या वर्षी झाले IAS अधिकारी; पण नोकरी सोडून केली Unacademy ची स्थापना

स्पर्धा परिक्षेचा नेमका किती तास अभ्यास केला पाहिजे?

नेमका किती तास अभ्यास केला पाहिजे? या प्रश्नावर आयएएस अवनीश शरण “अभ्यास किती तास केला यामुळे काही फारसा फरक पडत नाही. तर कशाप्रकारे केला हे महत्त्वाचं आहे असं ते सांगतात.” दरम्यान मी सुद्धा एकदा १८ तास अभ्यास केला होता मात्र त्यानंतर पुन्हा १८ तास झोपलो. त्यामुळे एवढा अभ्यास करायची गरज नसल्याचं ते सांगतात.