Success Story Of IAS Arjun Gowda : यूपीएससीची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यासाठी अनेक मंडळी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. पण, यामध्ये काही मोजक्याच लोकांना यश मिळते. या परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानंतर ही मंडळी आयएएस, आयपीएस होतात. अनेक वर्षे सरकारी नोकरी किंवा इतर अनेक क्षेत्रांत काम करून काही लोकांचे मन रमत नाही आणि त्यांचे मन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याकडे वळते. तर आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत (Success Story), ज्यांनी आयएएस अधिकारी होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र सोडले.

आयएएस अर्जुन गौडा यांचा जन्म कर्नाटकातील छोट्या गावात, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब होती. पण, लहानपणापासूनच ते हुशार विद्यार्थी होते. चांगली आणि उच्च पगाराची नोकरी मिळवून आर्थिक अस्थिरतेवर मात करण्याचे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला गावातील एका खाजगी शाळेत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर २०१६ मध्ये एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. अर्जुन गौडा यांना डॉक्टर व्हायचे होते, पण वैद्यकीय प्रॅक्टिस (medical practice) दरम्यान त्यांना जाणवले की, त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे आहे.

Rahul Kamble wins Mahavitaran Shri in bodybuilding competition pune print news
शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
BJP leader Kirit Somaiya alleged scam of issuing birth certificates to 15 845 Rohingyas
अकोला : बांगलादेशी रोहिंग्यांना प्रमाणपत्र; सोमय्यांनी पोलिसांना दिले पुरावे, एका गुन्ह्यात तीन आरोपींना…
success story of IAS Vinod Kumar
निधीचा गैरवापर, भ्रष्टाचाराच्या १० प्रकरणांमध्ये ठरवले गेले दोषी, चर्चेत राहिलेले ‘ते’ आयएएस अधिकारी आहेत तरी कोण?
BJP benefits from governments decision workers will become SPOs
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
Sunetra Pawar Speaker List of Rajyasabha
खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी; पहिल्याच टर्ममध्ये ‘या’ पदावर निवड!
Job Opportunity 234 Vacancies in HPCL career news
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मध्ये २३४ रिक्त पदे
construction worker in Susgaon beaten for inquiring about ongoing digging with Poklen
बांधकाम व्यावसायिकाला मारहाण; माजी नगरसेवकासह दोघांविरोधात गुन्हा

यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली (Success Story) …

रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या तयारीसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. कारण त्यांना वैद्यकीय व्यवसायासह आयएएस परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास करावा लागणार होता. परीक्षेची तयारी आणि वैद्यकीय व्यवसाय या आव्हानांना तोंड द्यावे लागले तरीही त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. आयएएस अर्जुन गौडा २०१८ च्या यूपीएससी सीएसई बॅचचे आयएएस आहेत आणि त्यांनी ऑल इंडिया रँक ४१८ वा क्रमांक मिळवला आहे.

आयएएस अर्जुन गौडा यांची मध्य प्रदेश केडरमध्ये बदली करण्यात आली. त्यांचे अधिकृत नाव डॉक्टर नागार्जुन बी गौडा आयएएस असे आहे. आयएएस नागार्जुन गौडा यांचे लग्न आयएएस सृष्टी देशमुखशी झाले आहे. सुमारे अडीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आयएएस दाम्पत्य विवाहबंधनात अडकले आहेत. जिद्दीने आणि मेहनतीच्या जोरावर प्रयत्न केले की यश आपल्यालाच मिळते आणि स्वप्न सत्यातही उतरते, हे आयएएस अर्जुन गौडा यांनी सिद्ध केले आहे.

Story img Loader