success Story of Ashley Nagpal : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. त्यातच ‘सी-फेसिंग अपार्टमेंट असेल तर आणखीनच चांगलं. तर आता बीजिंगला मागे टाकून मुंबई हे अब्जाधीशांचे केंद्र बनले आहे. हे गजबजलेले महानगर श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करत आहे; ज्यात व्यापारी नेते, स्टॉक ट्रेडर्स, सेलिब्रिटी, चित्रपट निर्माते यांचा समावेश आहे. तर आता या यादीत आणखीन एका नावाचा समावेश झाला आहे. एका व्यापाऱ्याने बॉलीवूड अभिनेत्यांच्या जवळ स्वतःचे हक्काचे घर घेतले आहे. कोण आहेत हे अब्जाधीश त्यांच्याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात…
ॲशले नागपाल असे यांचे नाव आहे. बंगळुरू विद्यापीठातून त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी मिळविली; जिथे त्यांनी १९८२ ते १९८६ पर्यंत शिक्षण घेतले. त्याआधी त्यांनी १९८१ मध्ये सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये १२ वी पूर्ण केली. नंतर १९७९ मध्ये त्यांनी सेंट दार्जिलिंगमधील पॉल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसेच आता ते जून १९८६ पासून Ebco प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.
ॲशले नागपाल यांची यशोगाथा ( success Story of Ashley Nagpal )
अलीकडेच ॲशले नागपाल आणि त्यांची पत्नी बियान्का नागपाल यांनी मुंबईच्या वरळी परिसरात ७,१३९ स्क्वेअर फुटांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. ओबेरॉय रिअल्टीच्या एलिट थ्री सिक्स्टी वेस्ट प्रकल्पाच्या ६० व्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या नवीन घरासाठी त्यांनी सुमारे रु. १.६२ लाख प्रति चौरस फूट रुपये दिले. या उच्च दर्जाच्या निवासी टॉवरमध्ये ४ ते ५ बेडरूमचे डुप्लेक्स, पेंटहाऊस, पाच पार्किंग जागा आणि अतिरिक्त १६४ चौरस फूट अतिरिक्त जागासुद्धा समाविष्ट आहे.
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक प्रख्यात निवासी प्रकल्प आहे, ज्यामध्ये दोन टॉवर आहेत. एक रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये आहे आणि दुसरा प्रीमियम अपार्टमेंट ऑफर करतो. हे उच्च-प्रोफाइल इंडिव्यूज्वल्स, विशेषत: बॉलीवूड स्टार आणि व्यावसायिकांचे निवासस्थान बनले आहे. बॉलीवूड अभिनेते शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, डी’मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी, एव्हरेस्ट मसालाचे वाडीलाल भाई शाह यांच्या येथे लक्झरी अपार्टमेंट आहेत. मे महिन्यात शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी सुमारे ६० कोटी रुपयांमध्ये ५,३९५ स्क्वेअर फूट अपार्टमेंट खरेदी केले आहे.