Success Story of Benu Gopal Bangur : हुरुन इंडिया रिच लिस्ट (Hurun India Rich List, 2024) मध्ये मंत लोकांच्या टॉप-१०० व्या यादीत, वय वर्षे ९३ असणारे, दिग्ग्ज उद्योगपती बेनू गोपाल बांगूर यांचा समावेश आहे. बेनू गोपाल बांगूर हे पश्चिम बंगालमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. देशातील सिमेंट उद्योगात त्यांचे नाव खूप प्रसिद्ध आहे. कारण – बेनू गोपाल बांगूर हे श्री सिमेंटचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. तर हुरुन इंडिया रिच लिस्टच्या यादीत सामील होणारे बेनू गोपाल बांगूर सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश म्हणून ओळखले जात आहे. तर याचपाश्वभूमीवर आज आपण त्यांच्या प्रासाबद्दल ( Success Story ) थोडक्यात जाणून घेणार आहोत…

बेनू गोपाल बांगूर मूळ कोलकत्ताचे रहिवासी आहेत. यांनी कोलकत्ता विद्यापीठातून बी.कॉमची पदवी मिळवली. बेनू गोपाल बांगूर हे अब्जाधीश बाबू मोशाई म्हणूनही ओळखले जातात. हुरुनने जाहीर केलेल्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांना ३२ वे स्थान दिले आहे. बेनू गोपाल बांगूर यांची एकूण संपत्ती ६५,८०० कोटी रुपये आहे आणि या वर्षी त्यांची संपत्ती १५ टक्क्यांनी वाढ सुद्धा झाली आहे. फोर्ब्सच्यारिअल टाइम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, संपत्तीच्या बाबतीत बेनू गोपाल हे एनआर नारायण मूर्ती आणि नुस्ली वाडिया यांसारख्या मोठ्या अब्जाधीशांपेक्षाही पुढे आहेत.

influence of political parties on mumbai university campuses
शिक्षणाच्या प्रांगणातील राजकीय गणिते! : एक विजय आणि अनेक प्रश्न
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
jalna kailas gorantyal and arjun khotkar
जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीवरून श्रेयाची लढाई
former femina editor vimla patil passes away vimla patil life information
व्यक्तिवेध : विमला पाटील
Crop varieties developed by the University
भाताची तीन नवीन वाणे शेतकऱ्यांच्या भेटीला…
Mumbai University Ban on student agitation
मुंबई विद्यापीठ परिसरात पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी, विद्यार्थी संघटनांकडून निषेध, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Land to Chandrasekhar Bawankule organization over the opposition of Finance and Revenue Department Mumbai
विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड
appointment of Dr Ajit Ranade as Vice-Chancellor of Gokhale Institute has been cancelled
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द

हेही वाचा…Success Story : वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी UPSC च्या मार्गाची निवड; पहिल्यांदा अपयश अन्… ; वाचा आयएएस अधिकाऱ्याची ‘ही’ गोष्ट

कंपनी पाच भागांमध्ये विभागली :

बनू गोपाल बांगुर यांचा भाऊ राम कूवर बांगूर आणि आजोबा मुंगी राम बांगूर यांनी १९१९ मध्ये कंपनीची स्थापना केली. बेनू गोपाल बांगूर यांचा जन्म १९३१ झाला आणि श्री सिमेंटची स्थापना १९७९ मध्ये करण्यात आली. बांगूर समूहाचा व्यवसाय अनेक उद्योगांमध्ये पसरलेला आहे. १९९१ मध्ये कंपनी पाच भागांमध्ये विभागली गेली. त्यावेळी सिमेंट क्षेत्राची जवाबदारी बेनू गोपाल बांगूर यांच्याकडे देण्यात आली आणि त्यांनी १९९२ मध्ये श्री सिमेंटचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला. जसजसा त्यांच्या व्यवसाय वाढत गेला तसतशी त्यांची कंपनीही वाढत गेली आणि आजच्या घडीला देशातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. वयाच्या या टप्प्यावर पोहचल्यानंतर २००२ पासून त्यांच्या सिमेंट व्यवसायाची धुरा त्यांचा मुलगा हरी मोहन बांगूर यांच्याकडे सोपवली. तसेच बनू गोपाल बांगुर आपल्या कुटुंबासह कोलकाता येथील एका आलिशान हवेलीत राहतात.असा आहे बेनू गोपाल बांगूर यांचा ( Success Story ) प्रवास…