Success story of Deepa Bhati: एका महिलेने आपल्या तीन मुलांचे संगोपन करताना UPPSC PCS परीक्षेची तयारी तर केलीच, पण तिने या परिक्षेत उत्तीर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ही कथा आहे दीपा भाटी यांची. दीपा भाटी या नोएडातील कोंडली बांगर गावची रहिवासी आहेत. दीपा यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या PCS 2021 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण परीक्षा उत्तीर्ण झाली तोपर्यंत दीपा भाटी यांच्या लग्नाला १८ वर्षे उलटून गेली होती. त्यांना तीन मुलं होती, पण सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्या सर्वत्र चर्चेत राहिल्या. पण आजही त्यांची कहाणी त्या तरुणांना खूप काही शिकवून जाते, जे अपयश मिळालं की पराभूत होऊन बसतात आणि असं सांगून हिंमत गमावू लागतात की त्यांच्या खांद्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत.

शिक्षिकेची नोकरी गमावली

दीपा भाटी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्ष आणि आयुष्याविषयी सांगितलं आहे. दीपा यांनी सांगितले की त्या गुर्जर समाजातून आल्या आहेत, जिथे मुलींची लग्न खूप लवकर होतात. त्यांच्याबरोबरच असंच काहीसं घडलं होतं, पण काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांच्या मनात आधीपासूनच होती. त्यामुळे त्यांनी बीएडचे शिक्षण घेतले आणि एका शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केले. नोकरीच्या काळात त्यांना घशाचा त्रास झाला होता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना बोलणे टाळण्याचा सल्ला दिला. शिक्षक बोललाच नाही तर शिकवणार कसा? असा प्रश्न दीपा यांच्यासमोर पडला. अशा परिस्थितीत त्यांच्या शिक्षकाचीही नोकरी गेली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा… ‘जंगली’ म्हणून चिडवलं, शाळेतूनही काढून टाकलं; पण हार न मानता पठ्ठ्याने सुरु केला लाखोंचा व्यवसाय; वाचा सत्यम सुंदरमचा प्रेरणादायी प्रवास

भावाने यूपीपीएससीची तयारी करण्याचा दिला सल्ला

दीपा भाटी सांगतात की जेव्हा त्यांची शिक्षिकेची नोकरी गेली तेव्हा त्या खूप अस्वस्थ झाल्या. पुढे काय करायचं याचा विचार त्या करू लागल्या. यावेळी त्यांच्या भावाने त्यांना उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPSC) पीसीएस परीक्षेची तयारी करण्यास सुचवले. त्यानंतर दीपा भाटी यांना नवे लक्ष्य मिळाले. दीपा त्यांच्या मुलाखतीत सांगतात की त्यांनी UPPSC टॉपर्सचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. याशिवाय त्यांची स्ट्रॅटेजी त्या समजू लागल्या.

घरकाम, मुलांची काळजी आणि तयारी

दीपा म्हणाल्या की हे सर्व काही सोपे नव्हते. त्या आधी घरची सगळी कामं करायच्या आणि मग मुलांना शाळेत पाठवायच्या. त्यानंतर त्या अभ्यासाला बसायच्या. यावेळी लोकांकडून टोमणेही ऐकायला मिळायचे. लोक म्हणायचे, “या वयात अभ्यासाचे भूत डोक्यात आले आहे.” त्या हे सर्व ऐकून घ्यायच्या, पण कशाचीही पर्वा न करता त्या यूपीपीएससीच्या तयारीत व्यस्त राहिल्या. मुलं म्हणायची, “आई काय तू, दिवसभर अभ्यासात व्यस्त असतेस.”

हेही वाचा… Success Story: ‘या’ IAS अधिकाऱ्याने केली होती नालेसफाई, आता पुन्हा आल्या आहेत चर्चेत, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी

दीपा भाटी यांनी पहिल्यांदाच यूपीपीएससी पीसीएस परीक्षा दिली तेव्हा त्यांना यश मिळाले नाही आणि त्या काही गुणांनी मागे पडली. आणि जेव्हा त्या दुसऱ्यांदाही नापास झाल्या तेव्हा घरातून सगळ्यांनी त्यांची थट्टा केली. पण शेवटी त्यांनी UPPSC PCS 2021 च्या परीक्षेत 166 वा क्रमांक मिळवला. शासकीय कन्या आंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी त्यांची निवड झाली. जेव्हा दीपा यांना हे यश मिळाले तेव्हा त्यांची मोठी मुलगी बारावीत, लहान नववीत तर मुलगा यूकेजीमध्ये शिकत होता.

Story img Loader