शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळवण्याचे बहुतेक लोकांचे स्वप्न असते, तर काही लोक ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करतात. डॉक्टर कामिनी सिंग यांनीही असेच काहीसे केले. चांगली कमाई करणाऱ्या कामिनी यांनी व्यवसायासाठी सरकारी नोकरी सोडली. मात्र, त्यांचा निर्णय अगदी योग्य होता. आज त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

कामिनी सेंद्रिय मोरिंगा (ड्रमस्टिक) लागवड करतात. भाजीबाजारात शेंगा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याला ड्रमस्टिक्स देखील म्हणतात. याची अनेक प्रकारे भाजी तयार केली जाते. इडली आणि डोसासोबत बनवलेल्या सांबारात भाज्यांसोबतही याचा वापर केला जातो. कामिनी मोरिंगा वनस्पतीपासून साबण, तेल, मच्छर प्रतिबंधक स्प्रे, चहा, मोरिंगा पावडर इत्यादी अनेक प्रकारची उत्पादने बनवतात. कामिनी यांचा दावा आहे की त्यांची सर्व उत्पादने सेंद्रिय आहेत.

unemployed engineers protested by displaying degrees and building certificate pylon at office entrance
बेरोजगार अभियंत्यांचा असाही निषेध, कामे मिळत नसल्याने पदव्या भिरकावल्या ,तोरण लावले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ॲमेझॉनच्या कामगारांचे काम बंद! पुण्यासह मुंबईतील ऑनलाइन सेवेला फटका बसणार
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
Income Tax
Income Tax : “वर्षाला ६० लाख रुपयांपेक्षा कमी कमावणारे सर्व गरीब, कारण ७० टक्के पगार तर…” तंत्रज्ञाची पोस्ट व्हायरल
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
readers reaction on different lokrang articles
लोकमानस : मध्यमवर्ग हवा, पण शेतकरी नको?

शेतकऱ्यांच्या संपर्कात आल्यानंतर गोष्टी घडल्या

कामिनी यांनी CISH, लखनौ येथे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. नोकरी करत असतानाच त्यांचा शेतीकडे कल वाढला. ७ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी मोरिंगा वर संशोधन करण्यासाठी २०१५ मध्ये राजीनामा दिला. त्यादरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित एका कंपनीने त्यांना प्रकल्प संचालकपदाची ऑफर दिली, ती त्यांनी स्वीकारली. या कंपनीत काम करत असताना त्यांचा अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आला.

२०१७ मध्ये सुरू झाला प्रकल्प

कामिनी सांगतात की, २०१७ मध्ये त्यांनी मोरिंगा लागवडीसाठी शेतकऱ्यांसोबत पायलट प्रोजेक्ट सुरू केला. कामिनी यांनी मोरिंगा लागवडीची निवड केली कारण त्याला कोणत्याही रसायनाची गरज नाही. शिवाय, ते प्रत्येक हंगामात वाढते.

त्यांनी सांगितले की या झाडाची पाने, मुळे आणि फळे (ड्रमस्टिक्स) जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहेत. त्याचा अर्क अँटीऑक्सिडंट, अँटी-कॅन्सर, अँटी-इंफ्लेमेटरी, ॲन्टी-डायबेटिक इत्यादी गोष्टींमध्ये वापरला जातो.

यानंतर कामिनी यांनी २०१९ मध्ये स्वतःची संस्था स्थापन केली आणि मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले. या संस्थेअंतर्गत कामिनी यांनी शेतकऱ्यांसह मोरिंगा पावडर, साबण, तेल, कॅप्सूल इत्यादी बनवण्यास सुरुवात केली.

नंतर व्यवसाय वाढला

कामिनी यांनी सुरुवातीला फक्त मोरिंगा पावडर बनवली. त्या जवळच्या बाजारपेठेत कॅनोपी स्टॉलद्वारे पाऊच पॅकिंगमध्ये विकायच्या. त्यादरम्यान त्यांनी आयआयटी (बीएचयू) मधील कृषी-व्यवसाय इनक्यूबेटरबद्दल ऐकले. तिथून तरुण कृषी व्यावसायिकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळायच्या. कामिनी यांनी मोरिंगावरील एका प्रकल्पासाठी अर्ज केला आणि त्यांना मंजुरी मिळाली. तेथून त्यांना २५ लाखांचे अनुदान मिळाले. त्याचा उपयोग त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी केला. त्यांनी तेल काढण्यासाठी आणि कॅप्सूल भरण्यासाठी मशीन विकत घेतली.

सुमारे दोन कोटींचा वार्षिक महसूल

आज कामिनी यांचा हा व्यवसाय करोडो रुपयांचा झाला आहे. त्या मोरिंगा उत्पादने ऑनलाइनदेखील विकतात. त्या ५० ते १०० शेतकऱ्यांसोबत काम करतात. त्या त्यांना मोरिंगा वाढवण्याचे प्रशिक्षणही देतात. त्यांच्याकडून पिकांची खरेदीही करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळते.

कामिनी यांची सध्याची वार्षिक कमाई १.७५ कोटी रुपये आहे. २०२५ च्या आर्थिक वर्षात त्यांची उलाढाल २.५० कोटी रुपये असेल असे त्या म्हणतात.

Story img Loader