Success story of IAS Deshal Dan Ratnu: जर तुमचा इरादा पक्का असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमचं यश गाठण्यापासून रोखू शकत नाही, असं म्हणतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे देशल दान रतनूची, जो राजस्थानच्या जैसलमेर येथील एका गरीब कुटुंबात वाढला आहे.

मर्यादित संसाधने आणि कोणतेही प्रशिक्षण नसतानाही, देशल दानने केवळ UPSC परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर ८२ वा अखिल भारतीय रँक मिळवून इतिहासही रचला.

Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…
Manjit Singh Success Story
Success Story : “शेतकरी असावा तर असा…” भाड्याने जमीन घेऊन केली हळदीची शेती; डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून झाला लोकप्रिय
loksatta chavadi political drama in Maharashtra
चावडी: भुजबळ तेव्हा आणि आता
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा

देशल दान रतनूचं शिक्षण

देशल दान रतनू याचा जन्म राजस्थानमधील जैसलमेर येथे झाला. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. मोठे झाल्यावर अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तो नेहमी त्याच्या वर्गात अव्वल होता. मेहनतीच्या जोरावर तो पुढे जात राहीला. IIT जबलपूरमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. दरम्यान, त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि अभ्यासात नियमितता राखली.

हेही वाचा… मेहनत आली फळाला! ‘या’ मुलाने हिंदी माध्यमात शिकून NEET मध्ये पटकावला पाचवा क्रमांक, देशातील टॉप कॉलेजमधून MBBS करण्याचं स्वप्न केलं साकार

आर्थिक परिस्थितीला आव्हान देऊन गेला पुढे

देशल दान गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील चहाचे दुकान चालवत होते आणि कुटुंबात सात भाऊ आणि बहिणी होत्या. मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्याच्या वडिलांवर होती. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्याची अवस्था बिकट होत होती, पण या परिस्थितीला त्याने यशाच्या मार्गात अडथळा बनू दिला नाही.

हेही वाचा… एकेकाळी दोन शिलाई मशीनपासून केली होती सुरुवात, आज आहे कोटींची संपत्ती; वाचा ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा प्रेरणादायी प्रवास

भावाची प्रेरणा कामी आली

देशल दानचा मोठा भाऊ भारतीय नौदलात होता आणि २०१० मध्ये तो शहीद झाला, ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्याचा भाऊ नेहमी त्याला अधिकारी व्हायला सांगत असे. यातून प्रेरित होऊन त्याने यूपीएससीच्या तयारीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने स्वबळावर यूपीएससीची तयारी केली. वेळेच्या व्यवस्थापनावर भर दिला. नोट्स बनवणे, उजळणी करणे आणि मागील वर्षाच्या पेपरचा सराव करणे हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. देशल दान रतनूने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ८२ वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झाला.

Story img Loader