हरियाणातील जगपाल सिंग फोगट यांनी कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता मधमाशीपालन सुरू केले. पूर्वी ते शाळेत शिक्षक होते. आपल्या परिश्रम, समर्पण आणि शहाणपणाने जगपाल सिंग फोगट यांनी २ कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण केला. ५०० हून अधिक शेतकऱ्यांना हा फायदेशीर व्यवसायही त्यांनी शिकवला. हे सर्व २००१ मध्ये सुरू झाले जेव्हा मधमाशी पालन ही त्यांच्या गावात अज्ञात संकल्पना होती. सुरुवातीच्या अडचणींनंतरही, जगपाल यांनी एका महिन्यात २५ डब्बे मधाने भरले. यावरून त्यांच्या कुटुंबीयांना या व्यवसायाची क्षमता लक्षात आली. २००७ मध्ये त्यांनी पूर्णपणे मधमाशीपालन सुरू केले. आता ते वेगवेगळे प्रोडक्ट्स विकून चांगला नफा कमवत आहे.

विरोधाला न जुमानता सुरुवात केली

सुरुवातीला जगपाल सिंग फोगट हे शाळेत शिक्षक होते. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका गावात २००१ मध्ये त्यांनी मधमाशीपालनाला सुरुवात केली. तेव्हा राज्यात हे काम फारसे नाही व्हायचे. त्यांच्या कुटुंबीयांनी, विशेषत: जगपाल सिंग यांच्या वडिलांनी मधमाशी पालन करण्याच्या त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. वडील गमतीने म्हणाले होते, ‘अरे मास्तर, गाय म्हैस पाळ, बकरी कोंबडी पाळ, माशी कोण पाळतं? ती उडून जाईल.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”

परिणाम पाहिल्यानंतर बदललं लोकांचं मत

खरंतर, २००१ मध्ये जगपाल सिंग फोगट यांच्या गावात मधमाशी पालन ही एक नवीन कल्पना होती. अनेकांना जगपाल हे वेडे वाटत होते. पण, आश्चर्यकारक परिणाम पाहून लोकांचे मत बदलले. एका नातेवाईकाला पाहून जगपाल यांना ही कल्पना सुचली. पहिल्याच महिन्यात २५ टिन मध विकून त्यांनी चांगली कमाई केली. प्रत्येक टिन दोन हजार रुपयांना विकले गेले. हे त्यांच्या कुटुंबाच्या गव्हाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त होते. या यशामुळे त्यांना मधमाशीपालनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.

हेही वाचा… मुलगा असावा तर असा! वडिलांचं छोटंसं दुकान बदललं कोटींच्या साम्राज्यात, पाहा, अवघ्या २२ व्या वर्षी पठ्ठ्यानं कशी स्थापन केली कंपनी

२००७ मध्ये शिकवणी सोडली

२००७ मध्ये, जगपाल यांनी मधमाशीपालनामध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून घेण्यासाठी शिकवणी सोडली. शेतीच्या पार्श्वभूमीतून आलेल्या जगपाल यांच्या लक्षात आले की मधमाशीपालनामुळे पारंपारिक शेती पद्धतींपेक्षा कितीतरी अधिक फायदे मिळतात. त्यांनी दिल्लीतील एका शेतकऱ्याकडून ६०,००० रुपये गुंतवून २,००० रुपये प्रति पेटी या दराने ३० मधमाश्यांच्या पेट्या विकत घेतल्या.

कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय त्यांनी इतर शेतकऱ्यांकडून शिकलेल्या आणि स्वतःच्या व्यावहारिक अनुभवावर विश्वास ठेवला. सुरुवातीला त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. पण, ते अपयशामधूनच धडा घेत राहिले.

हेही वाचा… बिसलेरीसारख्या कंपन्यांना फुटला घाम! ‘या’ महिलेने वयाच्या १७ व्या वर्षी सांभाळली व्यवसायाची धुरा, कष्टाने कंपनीची उलाढाल ८००० कोटींवर पोहोचवली

मोठे ब्रँड केले तयार

जगपाल यांनी हळूहळू व्यवसाय वाढवला. २०१६ मध्ये त्यांनी प्रोसेसिंग युनिटही स्थापन केले. मेणबत्त्या, साबण आणि रॉयल जेलीसारखे अनेक प्रोडक्ट्स या युनिटमध्ये बनवले जातात. ते ‘नेचर फ्रेश’ आणि ‘बी बझ’ या ब्रँड अंतर्गत आपली प्रोडक्ट्स विकतात. याला प्रमोट करण्यासाठी जगपाल यांनी अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. त्यामुळे त्यांचे प्रोडक्ट्स देशभरात विकले जाऊ लागले. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीचा महसूल दोन कोटी रुपये होता. जगपाल केवळ आपलाच व्यवसायच वाढवत नाही आहेत तर इतरांनाही मदत करत आहे. आतापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले आहे. ते ही गुंतवणूक मानतात जी परतावा देत राहते. जगपाल यांची कहाणी केवळ एका यशस्वी उद्योजकाचीच नाही तर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्याचीही आहे.

Story img Loader