Success Story Of Suresh Narayanan : कधी रात्री २ वाजता भूक लागते म्हणून तर कधी सकाळचा नाश्ता म्हणून दोन मिनिटांत झटपट होणारी मॅगी खायला सर्वांनाच आवडते. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले, तरीही मॅगी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. पण, मॅगीला विरोधही तितकाच झाला. नक्की कसा होता मॅगीचा प्रवास (Success Story), हे आपण आज या बातमीतून जाणून घेऊयात…

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची नेस्ले समूहाबरोबरच्या २६ वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची (Success Story) समाप्ती होणार आहे. २०१५ मध्ये मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या मॅगी नूडल्स ब्रँडचे पुनरुज्जीवन करण्याच्या नेतृत्वासाठी सुरेश नारायणन प्रसिद्ध आहेत.

share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
IAS Sreenath, Success Story
Success Story : कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
Viral Video Shows little ones Setup their own shop
चिमुकल्यांचं नवीन दुकान! उद्घाटन केलं, मित्र आले अन्… गावाकडील हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस
Success Story Of Varun Baranwal
Success Story : वडिलांचा गेला आधार, स्वत: उचलली जबाबदारी; सायकल दुरुस्तीचं काम करणारा बनला आयएएस अधिकारी
IAS officer Ram Bhajan Kumhar
Success Story: ‘जिद्द असावी तर अशी…’ राहण्यासाठी नव्हते घर, रोजंदार कामगार म्हणून केलं काम अन् UPSC परीक्षेत पटकावला ६६७ वा क्रमांक
Ulhasnagar, Kumar Ailani, kalani family, BJP MLA Kumar Ailani, Kumar Ailani news, Ulhasnagar latest news,
उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष

मॅगी नूडल्सवर बंदी :

नारायणन यांनी २०१५ मध्ये नेस्ले इंडियाचा पदभार स्वीकारला तेव्हा कंपनी एका गंभीर समस्येला सामोरे जात होती. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने देशभरात मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. नेस्लेच्या मॅगी नूडल्समध्ये धोकादायक रसायनांचा (शिसे) वापर केल्याच्या आरोपानंतर उत्पादनावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. कंपनीला बाजारातून ३८,००० टन नूडल्स परत मागवून घ्यावे लागले. कारण यामुळे लोकांच्या आरोग्यावर धोका होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा…Success Story : जिद्दीची गोष्ट! पिझ्झानं बदललं आयुष्य अन् आज उभारली कोट्यवधींची कंपनी; वाचा संदीप यांची प्रेरणादायी कहाणी

नारायणन यांनी संकटाचे फक्त व्यवस्थापन करण्याऐवजी ब्रँडची प्रतिमा सुधारण्यासाठी एक कॅम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटजी (comprehensive strategy) तयार केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मॅगी फक्त पुन्हा उभी राहिली नाही, तर तिने झपाट्याने लोकप्रियता मिळवून पुन्हा एकदा तात्काळ नूडल्स बाजारात आघाडीवर स्थान मिळवले आणि मॅगी पुन्हा घराघरांत आवडती बनली.

थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, इजिप्त आणि फिलीपिन्ससह अनेक देशांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावल्यामुळे नारायणन यांचे योगदान भारताच्या पलीकडेही आहे. ते नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमधील ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी देखील सक्षम आहेत. आर्थिकदृष्ट्या, नेस्ले इंडियाने नारायणन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची लक्षणीय वाढ पाहिली. कंपनीचा करानंतरचा नफा जवळपास सात पटींनी वाढला असून तो फायनान्शियल इयर २०२४ मध्ये ३,९३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचे बाजार भांडवलदेखील २०१५ मधील ५७,६१९ कोटी रुपयांवरून ऑक्टोबर २०२३ पर्यंत २,४७,९३३ कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दर्शविते.