Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात, परंतु काही उमेदवारांनाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते. काही उमेदवारांना वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही यश मिळवता येत नाही. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशाच एका यूपीएससी उमेदवाराबद्दल सांगणार आहोत, जिने एकेकाळी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला होता. परंतु, त्यानंतर तिने नागरी सेवेची तयारी करण्याचा निर्णय घेऊन अभिनयाच्या जगाला कायमचा निरोप दिला आणि नंतर ती आयएएस अधिकारी बनली.

IAS एचएस कीर्थना

दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री एचएस कीर्थना यांनी एकेकाळी दक्षिणात्य चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी ४८ मालिका आणि ३२ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांची निरागसता आणि दमदार अभिनयाच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच खूप प्रसिद्धी आणि नाव कमावले. कीर्थना यांनी अवघ्या चार वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. जेव्हा अभिनेत्री म्हणून कारकिर्दीच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांनी अभिनयाचे जग सोडून यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली तर अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एचएस कीर्थना यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्यासाठी दिवसरात्र कठोर परिश्रम करून अनेक प्रयत्न केले पण यशस्वी होऊ शकल्या नाही. कीर्थना पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्या, परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. अखेर २०२० मध्ये त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अखिल भारतीय रँकमध्ये १६७ वा क्रमांक मिळवला आणि भारतीय प्रशासकीय सेवा पदावर त्यांची नियुक्ती झाली.