सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ( SCI) (रिक्रूटमेंट सेल) ‘लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट्स’ पदांची अल्पावधीसाठी करार पद्धतीने भरती. पात्रता : कायदा विषयातील पदवी. (अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना कामावर रुजू होताना कायदा विषयातील पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.) उमेदवाराकडे संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये, लेखन क्षमता आणि कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक. वयोमर्यादा : (दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी) २०-३२ वर्षे. एकत्रित वेतन : दरमहा रु. ८०,०००/-.

निवड पद्धती : पार्ट- I – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (उमेदवाराची कायदा समजून घेऊन लागू करण्याची क्षमता आणि आकलन ( Comprehension) क्षमता जाणून घेण्यासाठी) परीक्षा ऑनलाइन मोडने घेतली जाईल.

aiims nagpur announced recruitment for various posts offering youth golden job opportunity
नोकरीची सुवर्णसंधी… नागपूर एम्समध्ये या पदासाठी भरा अर्ज…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ways to become ISRO scientist
नोकरीची संधी : इस्रोमधील शास्त्रज्ञ होण्याची संधी
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
How to Prepare for Government Jobs with Full Time Job
Sarkari Naukri: पूर्ण वेळ नोकरी करताना सरकारी नोकरीसाठी तयारी कशी करावी? परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी कसे करावे नियोजन?
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

पार्ट- II – वर्णनात्मक लेखी परीक्षा – लेखन कौशल्य आणि विश्लेषणात्मक कौशल्य तपासण्यासाठी पार्ट- II परीक्षेचे प्रश्न कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतील, उमेदवारांनी उत्तर मात्र पेन-पेपर मोडने लिहावयाची आहेत. पार्ट- III – इंटरव्ह्यू. पार्ट- I आणि पार्ट- II परीक्षा दि. ९ मार्च २०२५ रोजी (एकाच दिवशी) दोन सेशन्समध्ये देशभरातील २३ शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातील. (मुंबई, पुणे, नागपूर इ.)

पार्ट- I परीक्षेचे Model Answer Key (आदर्श उत्तर तालिका) सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर

(www.sci.gov.in) दि. १० मार्च २०२५ रोजी अपलोड केल्या जातील. लिंक उपलब्ध करून दिली जाईल. (दि. १० मार्च २०२५ (१२.०० वाजे)पासून दि. ११ मार्च २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत) त्यासाठी उमेदवारांना हरकती दाखल करण्यासाठी एका प्रश्नामागे रु. १००/- भरावे लागतील.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/- ऑनलाइन मोडने UCO Bank च्या Payment Gateway मधून भरावयाचे आहे. ऑनलाइन अर्ज www.sci.gov.in या संकेतस्थळावरील लिंकमधून दि. ७ फेब्रुवारी २०२५ (२३.५५ वाजे)पर्यंत करता येतील.

suhaspatil237@gmail.com

Story img Loader