प्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI), नवी दिल्ली येथे ‘सीनियर पर्सनल असिस्टंट’ पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ६५ (नियमानुसार अजा – १५टक्के, अज – ७.५टक्के, इमाव – २७टक्के, ईडब्ल्यूएस – १० टक्के जागा राखीव आहेत.) वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ८, मूळ वेतन रु. ४७,६००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ९२,०००/-.

पात्रता – (दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी) पदवी उत्तीर्ण. (शॉर्टहँड स्पीड ११० श.प्र.मि. आणि संगणक चालविण्याचे ज्ञान व टायपिंग स्पीड ४० श.प्र.मि.)

वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी) १८ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १०/१३/१५ वर्षे) सर्वोच्च न्यायालयातील कर्मचार्‍यांना कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.

निवड पद्धती –

(१) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा.

दि. ७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल. (१०० एमसीक्यू टाईप प्रश्न (जनरल इंग्लिश – २५ प्रश्न; जनरल नॉलेज – २५ प्रश्न; भारतीय राज्यघटनेतील न्याय व्यवस्था संबंधित तरतूदी – २५ प्रश्न; सुप्रीम कोर्ट रूल्स २०१३ वरील १५ प्रश्न; कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे ज्ञान – १ प्रश्न. एकूण १०० प्रश्न,

१०० गुण, वेळ ९० मिनिटे)

ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत पात्रतेसाठी ५० गुण मिळविणे आवश्यक. चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टनंतर उत्तरतालिका सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर

दि. ८ डिसेंबर २०२६ रोजी जाहीर केली जाईल. यासंबंधी काही हरकती असल्यास त्या दि. ८/९ डिसेंबर २०२६ (२३.५५ वाजे)पर्यंत ऑनलाइन मोडने पाठवावयाच्या आहेत. प्रत्येक हरकतीसाठी रु. १००/- भरावे लागतील. हरकत योग्य ठरल्यास भरलेले पैसे उमेदवारास परत केले जातील. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधून रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवार शॉर्टहँड टेस्ट आणि टायपिंग स्पीड टेस्टसाठी निवडले जातील.

(२) ११० श.प्र.मि. वेगाने शॉर्टहँड (इंग्लिश) कालावधी

७ मिनिटे, १०० गुण; ट्रान्सक्रिप्शनसाठी ४५ मिनिटे.

(३) कॉम्प्युटरवर टायपिंग स्पीड टेस्ट – इंग्लिश लँग्वेज किमान ४५ श.प्र.मि. वेगाने, वेळ १० मिनिटे, २० गुण. (फक्त पात्रता स्वरूपाची) परंतु प्रत्येक १टक्के चुकीसाठी १०टक्के गुण वजा केले जातील. (एकूण डिक्टेशन दिलेल्या शब्दांच्या ५टक्के चुका चालतील.) यात पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या

१:३ या प्रमाणात उमेदवार मुलाखतीकरिता निवडले जातील.

(४) मुलाखत – ३० गुण. पात्रतेसाठी किमान १५ गुण आवश्यक.

वरील १ ते ४ साठी पात्रतेचे निकष एकूण गुणांच्या ५० गुण मिळविणे आवश्यक.

शॉर्टहँड (इंग्लिश) टेस्ट आणि टायपिंग स्पीड टेस्ट (या दिल्ली/एनसीआर येथे होतीलच.) आणि इंटरव्ह्यूच्या (ऑनलाइन मोडने अथवा प्रत्यक्षपणे दिल्ली येथे होतील.) तारखा  www.sc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

अर्जाचे शुल्क – रु. १,५००/-. (अजा/अज/इमाव/मा.सै./अपंग – रु. ७५०/-) अर्जाचे शुल्क ऑनलाइन मोडने युको बँक गेटवे मार्फत भरावे.

परीक्षा केंद्र – छ. संभाजी नगर, मुंबई, नागपूर, पुणे, भोपाळ, इंदौर, जबलपूर, अहमदाबाद/गांधीनगर, बंगळुरू, हैद्राबाद इ.

अर्ज दाखल करतेवेळी उमेदवाराला नोकरी नसल्यास आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नोकरी मिळाल्यास त्याने तसे ब्रँच ऑफिसर, रिक्रूटमेंट सेल यांना  recruitment.cell@sci.nic.in  या ई-मेलवर तसे कळविणे अनिवार्य आहे.  ऑनलाइन अर्ज sci. gov. in या संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२६ (२३.५५ वाजे)पर्यंत करावेत.