BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदा (BOB)अंतर्गत विविध विभागांत कराराच्या अंतर्गत भरती होणार आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ जून २०२४ रोजी सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, अर्ज कसा करायचा, अर्ज शुल्क यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ. BOB Recruitment 2024 : रिक्त पदे आणि पदसंख्या या भरतीअंतर्गत विविध विभागांसाठी कराराच्या आधारावर ४५९ 'मानव संसाधन समन्वयक'च्या (Human Resource Coordinator) नियुक्तीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. उपाध्यक्ष - डेटा सायंटिस्ट (Dy. Vice President - Data Scientist) = २ पदे.सहाय्यक उपाध्यक्ष - डेटा सायंटिस्ट (Asst. Vice President - Data Scientist) = ५ पदे.उपाध्यक्ष - डेटा इंजिनिअर (Dy. Vice President - Data Engineer) = २ पदे.सहाय्यक उपाध्यक्ष - डेटा इंजिनिअर (Asst. Vice President - Data Engineer) = ४ पदे.आर्किटेक्ट (Application Architect) = १ पद.एंटरप्राइझ आर्किटेक्ट (Enterprise Architect) = १ पद.इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट (Infrastructure Architect) = पदे २ पदे.Integration तज्ज्ञ = २ पदे.तंत्रज्ञान आर्किटेक्ट = २ पदे.क्वालिटी Assurance इंजिनिअर्स = १ पद.सिनिअर डेव्हलपर = ८ पदे हेही वाचा…MahaGenco Recruitment 2024: अनुभवी इंजिनियर्सना नोकरीची संधी; महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती सुरू; असा करा अर्ज फूल स्टॅक जावा डेव्हलपर (Developer-Full Stack Java) - ३ पदे.डेव्हलपर-फुल स्टॅक NET आणि JAVA (Developer-Full Stack .NET & JAVA) = ५ पदे.सिनिअर डेव्हलपर - मोबाइल अप्लिकेशन डेव्हलपमेंट = २ पदे.डेव्हलपर - मोबाइल अप्लिकेशन डेव्हलपमेंट = ५ पदे.सिनिअर UI/UX डिझाइनर = १ पद.UI/UX डिझाइनर = १ पद.विभागीय विक्री व्यवस्थापक - MSME व्यवसाय = १ पद.विभागीय विक्री व्यवस्थापक - MSME - CV/CME = १ पद.विभागीय विक्री व्यवस्थापक - MSME - LAP व्यवसाय - १ पद.सहाय्यक उपाध्यक्ष MSME - १७ पदे.सहाय्यक उपाध्यक्ष MSME - (Sales CV/CME Loans) = ३ पदे.सिनिअर उपाध्यक्ष एमएसएमई – (Sales) = ७ पदे.सिनिअर मॅनेजर एमएसएमई – सेल्स = ७ पदे.सिनिअर मॅनेजर एमएसएमई - (Sales CV/CME Loans) = ४ पदे.मॅनेजर एमएसएमई - सेल्स = १२ पदे.मॅनेजर एमएसएमई (Sales CV/CME Loans) = ७ पदे. BOB Recruitment 2024: वयोमर्यदा व शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २४ ते ४५ वर्षेदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत पाहून घ्यावी. लिंक - -/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/2024/24-06/advertisement-contractual-re-initiation-12-06-24-11-49.pdf BOB Recruitment 2024: अर्ज शुल्क या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये; तर एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूडी (PWD) आणि महिला उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. BOB Recruitment 2024 : अर्ज कसा करायचा? १. बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.२. करिअर विभागावर क्लिक करा.३. ह्युमन रिसोर्सेस कॉर्डिनेटर भरतीसाठी Apply बटणावर क्लिक करा.४. रजिस्ट्रेशन नंबर मिळविण्यासाठी आवश्यक माहिती भरा.५. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.६. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरून घ्या.७. सबमिशन केल्यावर एक Unique Number तयार केला जाईल.८. उमेदवाराने अर्ज शुल्क भरून घ्यावे.९. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआऊटसुद्धा घ्या. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत बेबसाइटला भेट द्यावी किंवा अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि शेवटच्या तारखेची वाट न पाहता, वेळीच अर्ज दाखल करावा.