Job Interview Questions : अनेकदा आपल्याला नोकरीच्या अनेक संधी मिळतात पण मुलाखतीत आपण नापास होतो आणि मिळालेली सुवर्ण संधी आपण गमावतो. खरं तर मुलाखतीत आपण नोकरीसाठी का अर्ज केला आहे, आपल्यामध्ये कोणती कौशल्ये आहेत आणि त्याचा कंपनीला कसा फायदा होणार, याचा विचार मुलाखतकार करतो.

कंपनीला स्पष्ट विचार करणारी आणि कंपनीच्या हितासाठी काम करणारी व्यक्ती हवी असते. मुलाखतकार अशा कर्मचाऱ्यांच्या शोधात असतात जे एकत्र काम करण्यास इच्छुक आहेत आणि त्यांच्या कामाविषयी गंभीर आहेत. त्यामुळे मुलाखतीला जाताना त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची तयारी आपण करायला पाहिजे.

p chidambaram article on new criminal laws
समोरच्या बाकावरून : मग कोण देणार या प्रश्नांची उत्तरे?
if you speak about 7 things in an interview you will Definitely get job
हमखास मिळेल नोकरी! फक्त मुलाखतीदरम्यान ‘या’ सात गोष्टी न चुकता सांगा
Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
do you get Love Marriage or Arranged Marriage
लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? हाताच्या रेषा सांगतात, तुमचा विवाह कसा होणार?
What Uddhav Thackeray Said About Rahul Gandhi?
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलाच नाही, भाजपा खोटं नरेटिव्ह…”
Viral Video Why do women have higher cognitive abilities? What do body language analysts say?
स्त्रियांची आकलन क्षमता जास्त का असते? देहबोली विश्लेषक काय सांगतात?
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : अन्नदाता म्हणायचे, पण हमीभाव द्यायचा नाही

आज आपण अशी काही प्रश्न जाणून घेणार आहोत जी मुलाखतीच्या वेळी हमखास विचारली जातात.

आम्हाला तुमच्याविषयी सांगा

हा सर्वात जास्त विचारला जाणारा अत्यंत सामान्य प्रश्न आहे. मुलाखतीत पहिला प्रश्न तु्म्हाला हा सहसा विचारला जातो. खूप लोक हा अत्यंत सोपा प्रश्न समजून या प्रश्नाची नीट तयारी करून जात नाही पण तसे करू नये. तुमच्याविषयी आणि तुम्ही नोकरीसाठी का योग्य आहेत, हे त्यात सांगा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी, तुमची आवडी निवडी, सध्या तुम्ही काय काम करत आहात आणि कोणत्या जबाबदारी पार पाडता, तुमचा अनुभव आणि तुम्ही या नोकरीसाठी का योग्य आहात याविषयी सांगा.

तुम्ही येथे नोकरी करू का इच्छिता?

असा प्रश्न विचारताना मुलाखतकार तुम्हाला कंपनीविषयी काय माहिती आहे, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मुलाखतकाराच्या या प्रश्नाचे नीट उत्तर देण्यासाठी मुलाखतीला येण्यापूर्वी कंपनीविषयी माहिती घ्या. या प्रश्नाचे उत्तर देताना कंपनीचा सुरूवातीपासून कसा विकास झाला आणि तुम्ही या कंपनीसाठी कसे योगदान देऊ शकता, यावर भर द्या. कंपनीची वैशिष्ट्ये सांगा

तुम्ही या नोकरीसाठी कसे उत्तम आहात?

तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि कौशल्ये सांगण्यासाठी हा उत्तम प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही तुमची कौशल्ये, अनुभव आणि कंपनीसाठी तुम्ही कसे योग्य आहात याविषयी सांगा. भूतकाळात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे उदाहरणे द्या. तुम्ही फक्त काम करत नाही तर त्याचा चांगला परिणाम घडवून आणता, याविषयी सांगा. टिममध्ये काम करण्यास तुम्ही सक्षम आहात, हे सुद्धा सांगा.

हेही वाचा : मुंबईच्या लेकीनं नाव कमावलं! दोनदा NEET UG परीक्षेत अनुत्तीर्ण; पण तिसऱ्यांदा जिद्दीने मिळविले पैकीच्या पैकी गुण

तुमच्या सर्वात चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगा

या प्रश्नाचे उत्तर देताना आणि तुमच्या चांगल्या गोष्टी सांगताना नेहमी तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांना प्रकाशझोतात आणा. त्यासह तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची उदाहरणे द्या.
जसे की तुम्ही खूप लवकर कोणतीही समस्या सोडवता, त्यासाठी एखादे उदाहरण द्या.
तुमच्यामध्ये असलेल्या वाईट गुणांविषयी बोलताना तुम्ही या गोष्टी सुधारीत आहात, हे आवर्जून सांगा. मुलाखतकार तुम्ही कठीण परिस्थिती कशी हाताळता आणि त्यावेळी तुमचा दृष्टीकोन कसा असतो, याविषयी जाणून घेतात.

तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे?

अनेकदा आपण सर्व प्रश्नांची उत्तरे नीट देतो पण पगाराविषयी जेव्हा विचारले जाते तेव्हा अनेकांना याबाबत बोलणे कठीण जाते. समोर आलेली संधी गमावू नये यासाठी अनेक जण मिळेल तो पगार स्वीकारतात पण मुलाखतीला जाण्यापूर्वी पगाराविषयी विचार करा. त्यासाठी तुमचा अनुभव, तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि त्यानुसार तुमचा पगार किती असावा, याचे ऑनलाइन पेमेंट कॅल्क्युलेटरनुसार अवलोकन करा

पुढील पाच वर्षांमध्ये तुम्ही स्वत:ला कुठे पाहता?

मुलाखतकार या प्रश्नाद्वारे तुमचे ध्येय कोणती आहेत आणि तुम्ही स्वत:च्या विकासाकडे कसे बघता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. या प्रश्नाचे उत्तर देताना तुमचे उद्दीष्टे आणि ध्येय स्पष्ट करा. त्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेणार आहात आणि अनुभवाच्या जोरावर वर्तमानकाळात आणि भविष्यात कसे काम करणार आहात, याविषयी सांगा.