UGC NET Application Form 2025: जून २०२५ च्या यूजीसी नेट सत्राची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जून २०२५ मध्ये होणाऱ्या यूजीसी नेटसाठी अधिसूचना जारी केली आहे. एनटीएने यूजीसी नेट परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली असून परीक्षेची ऑनलाइन अर्जनोंदणी १६ एप्रिलपासून सुरू झाली आहे. परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी आता अर्ज नोंदणी करू शकतात. यंदाची परीक्षा ८५ विषयांसाठी होणार असून ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ‘सीबीटी’ ऑनलाइन पद्धतीने घेणार आहे.
विद्यापीठे आणि महाविद्यालये येथे ‘सहायक प्राध्यापक’ आणि ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप व सहाय्यक प्राध्यापक’ या पदांसाठी पात्र उमेदवार निवडण्यासाठी यूजीसी नेट ही परीक्षा घेतली जाते व दरवर्षी दोनदा ही परीक्षा घेतली जाते. डिसेंबर आणि जून महिन्यामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते.
अर्जप्रक्रिया कधीपासून सुरू?
अर्जप्रक्रिया १६ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे २०२५ आहे. परीक्षा शुल्क ८ मे पर्यंत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय द्वारे ऑनलाइन भरता येईल. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मुदत ९ व १० मे २०२५ आहे. शहर केंद्र परीक्षेची घोषणा अधिकृत वेबसाईटवर कळविण्यात येईल. हॉल तिकीट कधी येणार याबाबत अधिकृत वेबसाईटवर कळविण्यात येईल. परीक्षेची तारीख (अंदाजे) २१ जून ते ३० जून २०२५ आहे. एनटीए नेटची अधिकृत वेबसाईट https://ugcnet.nta.ac.in/ वर तुम्हाला अधिकची माहिती मिळेल. विद्यार्थी NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट देऊन किंवा या पृष्ठावर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून निर्धारित तारखांमध्ये ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात.
अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फाॅलो करा
- उमेदवार UGC NET परीक्षेसाठी अर्ज स्वतः लॅपटॉप/डेस्कटॉप किंवा मोबाइलद्वारे भरू शकतात.
- UGC NET अर्ज भरण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या.
- वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला UGC NET जून २०२५ वर क्लिक करावे लागेल: नवीनतम बातम्यांमध्ये
- नोंदणी/लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा.
- आता नवीन पेजवर, New Candidate Register Here लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
- नोंदणीनंतर उमेदवारांनी फॉर्मशी संबंधित इतर तपशील भरावेत.
- त्यानंतर उमेदवारांनी त्यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
- आता शेवटी विहित शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.