कॅटेगरी-१ ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर’ पद भरतीकरिता, तसेच कॅटेगरी-२ ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदावर नियुक्ती आणि पीएचडीसाठी प्रवेश आणि कॅटेगरी-३ फक्त Ph.D. प्रवेशाकरिता पात्रता निश्चित करण्यासाठी ८७ विषयांमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) – नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट जून २०२६) परीक्षा नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे.

पात्रता – ह्युमॅनिटिज आणि सोशल सायन्स (लँग्वेजेससह), कॉम्प्युटर सायन्स आणि अॅप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स इ. (Appendix-II आणि Appendix-IV मध्ये नमूद केलेल्या) विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/इमाव/ दिव्यांग/तृतीय पंथी उमेदवारांना ५०टक्के गुण आवश्यक.) किंवा ४ वर्षं कालावधीची पदवी परीक्षा किमान ७५टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवार JRF आणि Ph.D. प्रवेशासाठी पात्र असतील (अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस्/अपंग उमेदवारांना ७०टक्के गुण आवश्यक.)

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार NET परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना NET २०२६ चा निकाल जाहीर होणाऱ्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत पात्रता परीक्षा आवश्यक त्या गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक. उमेदवारांनी ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या विषयासाठीची NET परीक्षा लिहिणे आवश्यक. जर पदव्युत्तर पदवीचा विषय NET विषयांच्या यादीत नसल्यास त्या विषयाशी संबंधित विषय NET परीक्षेसाठी निवडावा.

वयोमर्यादा – (दि. १ जून २०२६ रोजी) ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ३० वर्षेपर्यंत. (इमाव (केंद्रीय यादीत असलेल्या जातींसाठी)/अजा/अज/दिव्यांग/तृतीय पंथी आणि महिला उमेदवारांसाठी – ३५ वर्षेपर्यंत) (LL.M. पात्रताधारकांसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट)

असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि Ph.D. प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता – कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.

परीक्षा पद्धती – लेखी परीक्षा (ऑनलाईन मोड CBT) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न – दोन पेपर्स.

  • पेपर-१ – ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण असे एकूण १०० गुण (टीचिंग/रिसर्च अॅप्टिट्यूड जाणून घेण्यासाठी टेस्ट ऑफ रिझनिंग अॅबिलिटी, रिडींग कॉम्प्रिहेन्शन, डायव्हर्जंट थिंकींग आणि जनरल अवेअरनेस विषयांवर आधारित).
  • पेपर-२ – १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण असे एकूण २०० गुण निवडलेल्या विषयावर आधारित डोमेन नॉलेज तपासण्यासाठी.

मॉक टेस्ट https://www.nta.ac.in/Quiz वर उपलब्ध आहे.

परीक्षेचा कालावधी ३ तास (१८० मिनिटे). सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. UGC-NET June २०२६ साठीची विषयांची यादी आणि त्यांचे कोड नंबर इन्फॉरमेशन बुलेटिनमधील Appendix-II मध्ये उपलब्ध आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम https://www.ugcnetonline.in/syllabus-new.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल.

ऑनलाइन अर्जात निवडलेल्या माध्यमातूनच प्रश्न विचारले जातील.

कॅटेगरी १ व २ ‘असिस्टंट प्रोफेसर’ किंवा ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी पात्रता उमेदवारांच्या UGC NET परीक्षेतील दोन्ही पेपर्समधील गुणांना ७०टक्के वेटेज आणि इंटरव्ह्यूमधील गुणांना ३०टक्के वेटेज देऊन निश्चित केली जाईल. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

पीएच.डी. फेलोशिप स्टायपेंड JRF साठी (३७,००० २७टक्के एच्आर्ए) रु. ४६,९९०/- दरमहा. २ वर्षांनंतर SRF साठी (रु. ४२,०००/- २७टक्के एचआरए) रु. ५३,३४०/- दरमहा दिले जाते.

UGC-NET June २०२६ परीक्षा २२ जून ते ३० जून २०२६ दरम्यान घेतली जाईल.

शंकासमाधानासाठी www.nta.ac.in किंवा ugcnet.nta.ac.in किंवा फोन नंबर ०११-४०७५९०००, ई-मेल – ugcnet@nta.ac.in वर संपर्क साधा.

ऑनलाइन अर्ज https://ugcnet.nta.ac.in/; https://ugcnet.ntaonline.in या संकेतस्थळावर २० मे २०२६ (२३.५० वाजे)पर्यंत करावेत.