scorecardresearch

Premium

UIIC मध्ये प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

UIIC Recruitment 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

UIIC Recruitment 2023
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. (Photo : United India Insurance )

UIIC Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने प्रशासकीय अधिकारी पदांच्या काही जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिर केली आहे. या भरती अंतर्गत विविध शाखेतील जवळपास १०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३

IGIDR Mumbai Bharti 2023
मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! IGIDR मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
BEML Recruitment 2023
ITI, डिप्लोमा आणि B.Sc उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा
Northern Coalfields Limited Bharti 2023
नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत ‘या’ पदाच्या ११४० जागांसाठी भरती सुरु, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज
Mumbai Port Trust Bharti 2023
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; २० हजारांहून अधिक पगार मिळणार, अर्जाची पद्धत जाणून घ्या

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी

पदाचे नाव व रिक्त पदे –

पदाचे नावशाखारिक्त पदे
लीगल स्पेशलिस्ट२५
अकाउंट्स/ फायनान्स स्पेशलिस्ट२४
कंपनी सेक्रेटरी
प्रशासकीय अधिकारीऍक्च्युअरी
डॉक्टर२०
इंजिनिअर२२
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट

एकूण रिक्त पदे – १००

शैक्षणिक पात्रता

लीगल स्पेशलिस्ट – ६० टक्के गुणांसह विधी पदवी + ३ वर्षांचा अनुभव.

अकाउंट्स/ फायनान्स स्पेशलिस्ट – ICAI/ ICWA किंवा ६० टक्के गुणांसह B.Com. किंवा M.Com.

कंपनी सेक्रेटरी – ६० टक्के गुणांसह पदवीधर + इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.

ऍक्च्युअरी – ६० टक्के गुणांसह सांख्यिकी/ गणित/ एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.

डॉक्टर – ६० टक्के गुणांसह MBBS/ BAMS/ BHMS.

इंजिनिअर – ६० टक्के गुणांसह सिव्हिल/ ऑटोमोबाईल /मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ ECE/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इन्फॉर्मेशन सायन्स विषयात B.Tech/ B.E/ M.Tech/ M.E.

ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट – ६० टक्के गुणांसह कृषी पदवी/ पदव्युत्तर पदवी.

हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना जलसंपदा विभागात सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

वयोमर्यादा

खुला – प्रवर्ग २१ ते ३० वर्षे.

ओबीसी – ३ वर्षांची सूट.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी – १००० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – २५० रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://uiic.co.in/

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २४ ऑगस्ट २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ सप्टेंबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1w4da7c6foND_GTCymgqU2vyt2xIb3A_n/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uiic bharati 2023 uiic administrative officer post recruitment start know last date to apply jap

First published on: 26-08-2023 at 12:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×