करोना महामारीपासून जगभरात नोकऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. अनेक बड्या कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला, त्यामुळे जगभरातील लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. मात्र जगभरात असे अनेक लोक आहेत जे अनोख्या कल्पनांच्या मदतीने घरात बसून लखपती बनत आहेत. यात लॉकडाऊन संपल्यानंतर लोक पुन्हा कामाच्या शोधात लागले. यात काही कमी शिकलेले लोक कठीण काळात काही छोट्या नोकऱ्या करण्यास तयार झाले, या नोकऱ्यांमध्ये आता अशी एका नोकरीची भर पडली आहे, जिचा पगार आणि काम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पक्षी हाकलवण्याचे काम
युनायटेड किंगडमची मिस्टर चिप्स नावाची कंपनी एका विचित्र नोकरीसाठी लोकांची भरती करीत आहे. नोकरीत काय करावे लागते हे जाणून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. ही कंपनी पक्ष्यांना हाकलवण्यासाठी ही नोकरी देत आहे. ही नोकरी तुम्हालाही थोडी विचित्र वाटली असेल पण ती करण्यासाठी अनेक जण तयार झाले आहेत.
दिवसाला २० हजार पगार
यात व्यक्तीला आजूबाजूच्या पक्ष्यांना हाकलवण्याचे काम करावे लागते. हे कसे करायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या कामासाठी कंपनी दिवसाला २० हजार रुपये देण्यास तयार आहे. पण तुमचे काम योग्य असले पाहिजे. जर तुम्ही पक्षी हाकलवण्यात यशस्वी झालात तर सायंकाळपर्यंत तुम्हाला लेखा विभागाकडून २० हजार रुपये घेऊन घरी जाऊ शकतो.
इतरांपेक्षा जास्त पगाराची नोकरी हवी आहे? हे ५ आहेत बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय
कंपनी पक्षी हाकलवण्यासाठी का एवढा पगार देते?
वास्तविक ही कंपनी फिश चिप्स बनवणारी कंपनी आहे. अशा स्थितीत कंपनीला अनेक मासे ठेवावे लागतात. पण हे मासे साठवून ठेवत असताना सीगल कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात. त्यांच्याकडील मासे चोरून पळून जातात आणि खातात. यामुळे चिप कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत होता. या समस्येचा सामना करण्यासाठी कंपनीचा बॉस ॲलेक्स बॉयड याने या नोकरीचा विचार केला.
अनेकांनी ‘या’ नोकरीसाठी केला अर्ज
कंपनीने सीगलपासून मासे वाचवणाऱ्या व्यक्तीला दिवसाला २० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या अनोख्या नोकरीची माहिती मिळताच आता अनेकांनी अर्ज करण्यास सुरुवात केली. पण सीगल पक्षाला हाकलवण्यात सर्वच अपयशी ठरले. या वेळी कोरी नावाच्या व्यक्तीने अनोख्या पद्धतीने सीगलला हाकलवण्यात यश मिळवले आहे. तो गरुडाच्या पोशाखात आला, ज्याला पाहून कोणीही सीगल किंवा इतर पक्षी आजूबाजूला फिरकले नाहीत.