यूनियन बँक (Union Bank of India) (भारत सरकारचा उपक्रम) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची भरती. एकूण पदे – १८६५. महाराष्ट्रातील रिक्त पदे – १९६ (अजा – १९, अज – १७, इमाव – ५२, ईडब्ल्यूएस – १९, खुला – ८९ (८ पदे दिव्यांग कॅटेगरी HI/OC/VI/ID साठी प्रत्येकी २ पदे राखीव)). गोवा राज्यातील पदे – ५ (खुला) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओसी साठी राखीव.)

पात्रता –

(दि. १ एप्रिल २०२६ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. पदवी परीक्षा १ एप्रिल २०२२ नंतर उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा –

(दि. १ एप्रिल २०२६ रोजी) २० ते २८ वर्षे. कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा /अज – १५ वर्षे. (विधवा/घटस्फोटीत/कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला (खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे))

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा विभागवार ब्रँचेसमधील (१) ग्रामीण/अर्धनागरी – रु. १५,०००/-; (२) शहरी – रु. १८,०००/-; (३) मेट्रो – रु. २०,०००/- स्टायपेंड दिला जाईल.

निवड पद्धती –

  • (i) ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज, (५) युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस. प्रत्येकी २० प्रश्न, २० गुण, कालावधी प्रत्येकी २० मिनिटे, एकूण १०० प्रश्न, वेळ ६० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
  • (ii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज – उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील स्थानिय भाषेची परीक्षा द्यावी लागेल. (ज्या उमेदवारांनी १० वी/१२ वीला संबंधित राज्यातील स्थानिय भाषा अभ्यासली असेल त्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना लँग्वेज टेस्ट द्यावयाची गरज नाही.)

राज्यनिहाय कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल. प्रतिक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवाराचे वैद्यकिय फिटनेस तपासून मगच नेमणूक दिली जाईल. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची असेसमेंट टेस्ट घेतली जाईल.

उमेदवारांना अॅप्रेंटिसशिप पोर्टल आणि NATS पोर्टल https://nats.education.gov.in/student_type.php (Student Register/ Student Login वर आपले नाव यापूर्वी रजिस्टर केले नसेल तर रजिस्टर करावे लागेल. तसेच त्यांनी NAPS पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in/ वर रजिस्ट्रेशन करावे. NAPS अॅप्रेंटिस कोड नंबर ऑनलाइन अर्ज भरताना द्यावा लागेल. NAPS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी आल्यास उमेदवारांनी NAPS पोर्टलवरील हेल्प मॅन्युअल अभ्यासावे. (Get started >; Candidate user manual)

उमेदवारांना रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी आल्यास त्यांनी NATS पोर्टल https://nats.education.gov.in/assets/manual/student_manual.pdf वरील Help Manual मधील सूचना वाचाव्यात. उमेदवारांनी अॅप्रेंटिस रजिस्ट्रेशन कोड (NAPS पोर्टलने जारी केलेला) व `Enrolment ID’ (NATS पोर्टलने जारी केलेला) जपून ठेवावा.
यशस्वीरित्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना BFSI SSC (info@bfsissc.com) यांचेकडून मेलद्वारे तसे सूचित केले जाईल.

अर्जाचे शुल्क आणि इंटिमेशन फी – खुला/इमाव/ईडब्ल्यूएस – रु. ८००/-. (खुला/इमावच्या महिला उमेदवारांना रु. ६००/- आहे.) अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना रु. २००/-. याशिवाय उमेदवारांना १८… जीएसटी भरावे लागेल.

उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील ३ जिह्यांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे. (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे)

अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस उमेदवारांनी केंद्र सरकारने विहीत केलेल्या नमुन्यातील दाखले कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी apprentice@unionbankofindia.bank किंवा info@bfsissc.com यावर संपर्क साधावा. तसेच या ई-मेल आयडीवरून परीक्षेचा दिनांक, वेळ इ. माहिती मे/जून २०२६ मध्ये उमेदवारांना पाठविली जाईल.

उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी व वेळी स्वतचा camera enabled desktop किंवा Laptop किंवा tablet किंवा smart plune वापरून ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेला आयडी प्रूफ उमेदवारांना परीक्षेच्या वेळी स्क्रीनवर दाखवावा (Display) लागेल.

विस्तृत माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक http://www.unionbankofindia.co.in किंवा https://bfsissc.com या वेबसाईटवरील Careers Section मध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज www.unionbankofindia.bank.in/recruitment.aspx या वेबसाईटवर दिलेल्या लिंकमधून किंवा BFSI SSC वेबसाईट https://beep.bfsissc.com/candidate_register/mkt वर दि. १९ मे २०२६ पर्यंत करावेत.

दिनांक : ०१ मे २०२६

सुहास पाटील ९८९२००५१७१