● युनियन बँक ऑफ इंडिया ( UBI) (पब्लिक सेक्टर बँक), सेंट्रल ऑफिस, मुंबई. ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’, ‘असिस्टंट मॅनेजर JMGS- Il पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ५००.

पदाचे नाव – (१) असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) – २५० पदे. (२) असिस्टंट मॅनेजर (आयटी) – २५० पदे.

पात्रता – (दि. २० मे २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा उत्तीर्ण) आणि २ वर्षं कालावधीचा पूर्ण वेळ एमबीए/एमएमएस/ पीजीडीएम/पीजीडीबीएम (फिनान्स स्पेशलायझेशन) सह किमान सरासरी ६० टक्के गुण किंवा सीए/सीएमए/सीएस अनुभव इष्ट – PSBs/ इारक मधील कामाचा अनुभव.

पात्रता – बी.ई./बी.टेक./एमएस/एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/डेटा सायन्स/मशिन लर्निंग अँड एआय/सायबर सिक्युरिटी) किंवा एमसीए/एमएससी (आयटी).

इष्ट पात्रता – क्लाऊड सर्टिफाईड अॅडमिनिस्ट्रेशन/सर्टिफाईड क्लाऊड सिक्युरिटी प्रोफेशनल/ Cisco सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट/ डेटा अॅनालिसिस सर्टिफिकेशन इ.

अनुभव – क्लाऊड ऑपरेशन्स/ नेटवर्किंग/डेटा अॅनालायटिक्स/डेटा इंजिनीअरिंग इ. आयटी डोमेनमधील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०२५ रोजी) २२३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

प्रोबेशन – निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

वेतन श्रेणी – (रु. ४८,४८०- ८५,९२०) मूळ वेतन रु. ४८,४८०/- स्पेशल अलाऊन्स, डिअरनेस अलाऊन्स इतर भत्ते.

निवड पद्धती – निवड पद्धतीमध्ये ऑनलाइन परीक्षा/ग्रुप डिस्कशन (५० गुणांसाठी) (जर घेतले तर)/अर्जांची छाननी आणि/किंवा पर्सोनल इंटरव्ह्यू (५० गुणांसाठी) यांचा समावेश असेल. ऑनलाइन परीक्षा/टेस्ट पार्ट-१ क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, (२) रिझनिंग, (३) इंग्लिश लँग्वेज – प्रत्येकी २५ प्रश्न, एकूण ७५ गुण, वेळ ७५ मिनिटे. एकूण १५ प्रश्न आणि २२५ गुण, वेळ १५० मिनिटे. चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

ऑनलाइन परीक्षेतील गुणांनुसार इंटरव्ह्यूकरिता रिक्त पदांच्या ३ पट उमेदवारांना बोलाविले जाईल. इंटरव्ह्यू ५० गुणांसाठी घेतली जाईल, यातून पात्र होण्यासाठी किमान ५ टक्के गुण मिळविणे आवश्यक. (अजा/अज/इमाव/दिव्यांग यांचेसाठी ४५ टक्के गुण.) इंटरव्ह्यूच्या वेळी कागदपत्र पडताळणी होईल.

ऑनलाईन परीक्षेतील गुण आणि इंटरव्ह्यूमधील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल. जर ऑनलाइन परीक्षा घेतली गेली नाही आणि फक्त इंटरव्ह्यू घेतले किंवा इंटरव्ह्यू आणि जीडी घेतले तर संबंधित गुणांनुसार अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा केंद्र – कोल्हापूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/ MMR, नागपूर, नाशिक, पुणे व पणजी इ.

अर्जाचे शुल्क – खुला/ईडब्ल्यूएस/इमाव – रु. १,१८०/- (जीएसटीसह); अजा/अज/दिव्यांग – १७७/- (जीएसटीसह).

ऑनलाइन अर्ज www. unionbankofindia. co. in या संकेतस्थळावर दि. २० मे २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail.com