केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (II) २०२६ दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करणार आहे, यातून ४५१ पदांची भरती पुढील कोर्सेससाठी केली जाईल. (Examination Notice No. ११/२०२६/CDS-II)(१) इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून (आय्एम्ए) – १०० पदे. (१३ पदे. NCC-`C’ सर्टिफिकेट (आर्मी विंग) धारकांसाठी राखीव). १६३ वा (DE) कोर्स जुलै, २०२७ पासून सुरू होणार.

(२) इंडियन नेव्हल अॅकॅडमी (आय्एन्ए), इझिमाला, केरळ – २६ पदे. (६ पदे. NCC-`C’ सर्टिफिकेट (नेव्हल विंग) धारकांसाठी आणि १ हैड्रोसाठी राखीव). एक्झिक्युटिव्ह ब्रँच (जनरल सर्व्हिस/हैड्रो) कोर्स जुलै, २०२७ पासून सुरू होणार.

(३) एअरफोर्स अॅकॅडमी, हैद्राबाद (२२२ वा प्री-फ्लाईंग ट्रेनिंग कोर्स) – ३२ पदे. (३ पदे. NCC-`C’ सर्टिफिकेट (एअरविंग) धारकांसाठी राखीव) कोर्स जुलै २०२७ पासून सुरू होणार.

(४) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – २७५ पदे (१२६ वा एस्एस्सी (पुरुष) (एन्टी) (UPSC). कोर्स ऑक्टोबर, २०२७ पासून सुरू होणार.

(५) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई – १८ पदे. एस्एस्सी (महिला) (NT) (UPSC) कोर्स) ऑक्टोबर, २०२७ पासून सुरू होणार.

महिला उमेदवार फक्त ओटीए, चेन्नई `SSC Women (NT) UPSC कोर्स’ ट्रेनिंगसाठी पात्र आहेत. त्यांनी अर्जात OTA प्रथम आणि एकच पसंती दाखवावी.

जे उमेदवार एअरफोर्स अॅकॅडमीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी AFA करिता प्रथम पसंती द्यावी. त्यांना कॉम्प्युटर पायलट सिलेक्शन सिस्टीम CPSS ला सामोरे जावे लागेल. जर त्यांनी AFA साठी दुसरा वा तिसरा पसंतीक्रम दिल्यास तो अग्राह्य धरला जाईल.

ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना लग्न करता येणार नाही.

पात्रता – (अ) आय्एम्ए आणि ओटीएसाठी – पदवी (कोणत्याही शाखेतील).

(ब) आय्एन्एसाठी – इंजिनीअरिंग पदवी किंवा बी.एससी. (फिजिक्स) (१२ वी फिजिक्स आणि मॅथ्स विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक).

(क) एअरफोर्स अॅकॅडमीसाठी – पदवी (कोणत्याही शाखेतील) परंतु १२ वी फिजिक्स, गणित विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा इंजिनीअरिंग पदवी.

अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र IMA आणि INA साठी दि. १ जुलै २०२७ पूर्वी, एअर फोर्स अॅकॅडमीसाठी दि. १३ मे २०२७ पर्यंत, OTA साठी दि. १ ऑक्टोबर २०२७ पर्यंत सादर करावेत.

वयोमर्यादा – आय्एम्ए/आय्एन्ए – अविवाहीत पुरुष उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै २००३ ते १ जुलै २००८ दरम्यानचा असावा.

एअरफोर्स अॅकॅडमीसाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै २००३ ते १ जुलै २००७ दरम्यानचा असावा. (दि. १ जुलै २०२७ रोजी २० ते २४ वर्षे). DGCA कमर्शियल पायलट लायसन्सधारक – जन्म दि. १ जुलै २००१ ते दि. १ जुलै २००७ दरम्यानचा असावा. २५ वर्षांखालील उमेदवार अविवाहीत असावा. २५ वर्षांवरील विवाहीत उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (त्यांना विवाहीत निवास दिले जाणार नाही.)

(४) ओटीएसाठी अविवाहीत पुरुष/महिला उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै २००२ ते १ जुलै २००८ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – आर्मीसाठी उंची (पुरुष) फ्लाईंग ब्रँचसाठी १६३ सें.मी., इतर ब्रँचेससाठी – (पुरुष)१५७ सें.मी., (महिला) – १५२ सें.मी.; नेव्हीसाठी (पुरुष) – १५७ सें.मी.; एअरफोर्ससाठी (पुरुष) – फ्लाईंग ब्रँचसाठी १६२ सें.मी. ग्राऊंड ड्युटीसाठी १५७ सें.मी., छाती (पुरुष) – किमान ५ सें.मी. छाती फुगविता येणे आवश्यक. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असावे. दृष्टी – Uncorrected Vision ६/१२ & ६/१२ Corrected Vision R ६/६ & L ६/६. AFA फ्लाईंग ब्रँचसाठी uncorrected ६/६, ६/९ आणि Corrected ६/६, ६/६.

अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/अज/महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि. ९ जून २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत भरता येईल.

निवड पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा आणि मुलाखत.

आय्एम्ए, आय्एन्ए आणि एअरफोर्स अॅकॅडमीसाठी (इंग्लिश – १०० गुण, जनरल नॉलेज – १०० गुण, प्राथमिक गणित – १०० गुण, (गणित विषयाचा अभ्यासक्रम १० वी स्तरावरील व इतर विषयांचा अभ्यासक्रम पदवी स्तरावरील असेल.) कालावधी प्रत्येकी – २ तास. एकूण ३०० गुण.

ओटीएसाठी – इंग्लिश – १०० गुण, जनरल नॉलेज – १०० गुण, कालावधी प्रत्येकी २ तास. एकूण २०० गुण.

लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी सारखेच गुण असतील. (ओएम्आर् शीटवर उत्तरे फक्त काळ्या बॉलपॉईंट पेननेच मार्क करावयाची आहेत.) प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र – छ. संभाजीनगर/मुंबई/नवी मुंबई/पुणे/ठाणे, नागपूर, नाशिक, पणजी इ.

एस्एस्बी – मुलाखत (इंटेलिजन्स अँड पर्सोनॅलिटी टेस्ट) – कालावधी ४ दिवस. स्टेज-१ – ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटींग (OIR) टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन डिस्क्रीप्शन टेस्ट (PP & DT). स्टेज-२ – इंटरह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क, सायकॉलॉजी टेस्ट्स आणि कॉन्फरन्स.

ट्रेनिंग – आय्एम्ए येथे आर्मीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना (जेंटलमन कॅडेट्स) १८ महिन्यांचे मिलिटरी ट्रेनिंग दिले जाईल. हे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमन कॅडेट्सना लेफ्टनंट रँकवर परमनंट कमिशनवर तैनात केले जाईल. IMA आणि OTA येथील ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. कॅडेट्सना रु. १.२५ कोटींचे आर्मी ग्रुप इन्श्युरन्स संरक्षण दिले जाईल.

एअरफोर्स अॅकॅडमी येथे फ्लाईंग ब्रँचसाठी ७४ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना फ्लाईंग ऑफिसर पदावर तैनात केले जाईल. कॅटेडट्सना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

ओटीए – येथे जेंटलमन कॅडेट्स/लेडी कॅडेट्सना ४९ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर तैनात केले जाईल व त्यांना मद्रास युनिव्हर्सिटीकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्टॅटेजिक स्टडीज पदवी दिली जाईल.

आय्एन्ए मध्ये ४४ आठवड्यांचा नेव्हल ओरिएंटेशन कोर्स, ६ महिन्यांचे ऑफिसर्स सी ट्रेनिंग, ६ महिन्यांचे सब-लेफ्टनंट अफ्लोट ì^sefvebie, सब लेफ्टनंट (टेक्निकल कोर्स) अफ्लोट अॅटॅचमेंट ३३ आठवडे आणि फुल नेव्हल वॉचकिपींग सर्टिफिकेट – ६ ते ९ महिने दिले जाईल. १८ महिन्यांचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना सब लेफ्टनंट रँकवर कमिशन दिले जाईल.

ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर कॅडेट्सना पे-लेव्हल १० वर वेतन ठरविले जाईल, जे अंदाजे रु. १,४०,०००/- एवढे आहे व त्यांना ट्रेनिंग दरम्यानचे इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी पदांचा (कोर्ससाठीचा) आपला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी संपर्क दूरध्वनी ०११-२४०४१००१ (कामाच्या दिवशी सकाळी १० ते १७.३० वाजेपर्यंत).

आर्मीमधील महिला ऑफिसर्स २ वर्षांच्या चाईल्ड केअर लिव्हसाठी पात्र आहेत.

अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती www.upsconline.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ आणि सिग्नेचर jpg format मध्ये स्कॅन करून अपलोड करावयाचे आहेत.

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराचा अपलोड केलेला फोटोग्राफ आणि लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर केला जाईल. त्यासाठी https://upsconline.nic.in या वेबसाईटवरील FAQ मधील सूचनांचे पालन करावे.

ऑनलाइन अर्ज http://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ९ जून २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करावा.

लेफ्टनंट पदाची संधी

१२ वी उत्तीर्ण पुरुष/महिला अविवाहीत उमेदवारांना डिफेन्समध्ये लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधीयुनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) दि. १ जुलै २०२७ पासून सुरू होणाऱया एन्डीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्जमधील १५८ वा कोर्स आणि १२० वा इंडियन नेव्हल अॅकॅडमी कोर्स (INAC) साठी दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अँड नेव्हल अॅकॅडमी एक्झामिनेशन (II) २०२६’ ही प्रवेश परीक्षा घेणार आहे.

प्रवेश क्षमता – ३९४ पदे. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी ३७० जागा. (आर्मी – २०८ (महिलांसाठी – १० जागा), नेव्ही – ४२ (महिलांसाठी – ५ जागा) आणि एअरफोर्स – १२० (फ्लाईंग ब्रँचसाठी – ९२ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल) ब्रँच – १८ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – १० जागा (यातील २ जागा महिलांसाठी)). नेव्हल अॅकॅडमी (१० २ कॅडेट एन्ट्री स्कीम) – २४ जागा (३ जागा महिला उमेदवारांसाठी).

परीक्षा केंद्र – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, छ. संभाजीनगर, पणजी इ.

पात्रता – (i) एन्डीए आर्मी विंगसाठी – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), (ii) एन्डीएमधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमीमधील १० २ कॅडेट एन्ट्रीसाठी – १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण.

१२ वीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना दि. १० जून २०२७ पर्यंत १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी २००८ ते १ जानेवारी २०११ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – उंची (पुरुष) – एअरफोर्स फ्लाईंग ब्रँचसाठी १६२ सें.मी. (पुरुष/महिला), ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी – १५७ सें.मी.; (१८ वर्षांखालील मुला/मुलींना २ सें.मी. ची सूट मिळू शकते.) उंची – महिला – १५२ सें.मी.; आर्मीतील फ्लाईंग ब्रँचसाठी किमान उंची १६३ सें.मी.; वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात. नेव्हीसाठी पुरुष – उंची – १५७ सें.मी., महिला – उंची – १५२ सें.मी.

दृष्टी – नेव्हीमधील एन्ट्रीसाठी चष्म्याशिवाय ६/१२, ६/१२; चष्म्यासह – ६/६, ६/६. आर्मी एन्ट्रीसाठी दृष्टी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह – ६/६, ६/६. एअरफोर्स विंगसाठी दृष्टी – ग्राऊंड ड्युटी ब्रँचेससाठी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह ६/६, ६/६; फ्लाईंग ब्रँचसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९, चष्म्यासह ६/६, ६/६.

इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदुरूस्तीकरिता पुढील सराव ठेवावा. (ए) २.४ कि.मी. अंतर १५ मिनिटांत धावणे, (बी) स्किपिंग, (सी) पुशअप्स आणि सिटअप्स (किमान २० प्रत्येकी), (डी) चिनअप्स किमान ६, (इ) रोप क्लाइंबिंग – ३ ते ४ मीटर.

परीक्षा पद्धती – ओएम्आर् शिटवर उत्तरे फक्त काळ्या बॉल पॉईंट पेननेच मार्क करावयाची आहेत. (ए) लेखी परीक्षा – एकूण ९०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. पेपर – (१) मॅथेमॅटिक्स कालावधी २ १/२ तास, गुण ३००, पेपर – (२) जनरल अॅबिलिटी टेस्ट कालावधी २ १/२ तास, गुण ६००. पार्ट-ए – इंग्लिश – २०० गुण, पार्ट-बी – जनरल नॉलेज – ४०० गुण. (सेक्शन-ए – फिजिक्स – १०० गुण, सेक्शन-बी – केमिस्ट्री – ६० गुण, सेक्शन-सी – जनरल सायन्स – ४० गुण, सेक्शन-डी – इतिहास, फ्रिडम मुव्हमेंट (सोशल स्टडीज) – ८० गुण, सेक्शन-ई – जीओग्राफी – ८० गुण आणि सेक्शन-एफ् – करंट इव्हेंट्स – ४० गुण). प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेचा निकाल ऑक्टोबर २०२६ मध्ये जाहीर करण्याचे नियोजित आहे.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एस्एस्बी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी आर्मीसाठी http://www.joinindianarmy.nic.in नेव्हीसाठी http://www.joinindiannavy.gov.in एअरफोर्ससाठी प्रथम पसंती असलेल्या उमेदवारांनी AFSB साठी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगइन करा.

(बी) एस्एस्बी इंटरह्यू – डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ दरम्यान घेतले जातील. (i) स्टेज-१ – ऑफिसर, इंटेलिजन्स रेटींग (OIR) टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रीप्शन टेस्ट (PP & DT). (ii) स्टेज-२ – इंटरह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क्स, सायकॉलॉजी टेस्ट आणि कॉन्फरन्स या टेस्ट ४ दिवस चालतील. एस्एस्बी इंटरह्यू एकूण – ९०० गुण.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (Depee/Depe/ceefnuee/(JCOs/NCOs/ORs यांचे मिलिटरी स्कूल/सैनिक स्कूल्स सोसायटीच्या सैनिक स्कूलमध्ये शिकत असणारे पाल्य यांना फी माफ)). ऑनलाइन/इंटरनेट मोडने फी भरता येईल.

ट्रेनिंग – NDA च्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे प्रिलिमिनरी ट्रेनिंग एन्डीए, पुणे येथे दिले जाईल आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझिमाला, केरळ येथे ४ वर्षांच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या (अ) आर्मी कॅडेट्सना बी.एस्सी./बी.एस्सी. (कॉम्प्युटर)/बी.ए.; (ब) नेव्हल कॅडेट्सना बी.टेक्. (डिग्री); (क) एअरफोर्स कॅडेट्सना बी.टेक्./बी.एस्सी./बी.एस्सी. (कॉम्प्युटर) डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील.

एन्डीएमधून उत्तीर्ण – आर्मी कॅडेट्सना – इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (आय्एम्ए), डेहराडून येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग); नेव्हल कॅडेट्सना इंडियन नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग) आणि फ्लाईंग ब्रँच एअरफोर्स कॅडेट्सना एअरफोर्स अकॅडमी हैद्राबाद येथे (

१ १/२ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल.) एअरफोर्स ग्राऊंड ड्युटी ब्रँच कॅडेट्सना १ वर्षाचे ट्रेनिंग एअरफोर्स टेक्निकल कॉलेज, बेंगलुरू येथे दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱया जेंटलमेन कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर, नेव्हल कॅडेट्सना सबलेफ्टनंट पदावर आणि एअरफोर्स कॅडेट्सना फ्लाईंग ऑफिसर पदावर (पे-लेव्हल – १० (५६,१०० – १,७७,५००) (अधिक मिलिटरी सर्व्हिस पे (MSP) रु. १५,५००/- आणि इतर भत्ते)) तैनात केले जाईल.

ट्रेनिंग दरम्यान जेंटलमन/महिला कॅडेट्सना IMA येथील ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- स्टायपेंड (दरमहा) दिले जाईल. त्यांचे ट्रेनिंग दरम्यान देय असलेल्या भत्त्यांची थकबाकी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

प्री कमिशनिंग ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सचा रु. १.२५ कोटीचा विमा उतरविला जाईल.

शंकासमाधानासाठी UPSC च्या सुविधा केंद्राचा टेलिफोन नं. ०११-२४०४१००१ वर कामाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १७.३० वाजेपर्यंत संपर्क साधावा. ई-मेल आयडी upscsoap@nic.in ई-अॅडमिट कार्ड UPSC च्या वेबसाईटवर (upsc.gov.in) परीक्षा सुरू होण्याच्या तारखेच्या अगोदरच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांना जर ई-अॅडमिट कार्ड वेळेवर मिळाले नाही तर त्यांनी ताबडतोब वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी वन टाईम रजिस्ट्रेशन (OTR) करणे आवश्यक. One time registration (OTR) प्रोफाईलमध्ये आयुष्यात फक्त एकदाच बदल करता येईल. ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेल्या फोटोग्राफ आणि लाईव्ह कॅप्चर केलेला फोटोग्राफ https://upsconline.nic.in वरील FAQ मधील सूचनांप्रमाणे असणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज http://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ९ जून २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.