केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन – २०२६ (Examination Notice No. ०५/२०२६-CSE, dtd. ०४.०२.२०२६) केंद्र सरकारमधील ग्रुप-ए च्या १८ सर्व्हिसेस (जसे की आय्.ए.एस्., आय्.पी.एस्., आय्.एफ्.एस्., आय्.आर्.एस्. इत्यादी आणि ग्रुप-बीच्या एका सर्व्हिसमधील पदांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ४ विविध सर्व्हिसेसमध्ये ग्रुप-बीच्या अशा एकूण ९३३ पदांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग दि. २४ मे २०२६ रोजी सिव्हील सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन – २०२५ घेणार आहे. (यातील ३३ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत. (अंध व अल्पदृष्टी – ७ पदे, मूक व कर्णबधिर – ११ पदे, शारीरिक हालचाल विषयक अपंगत्व – ८ पदे, एकापेक्षा अधिक गटांतील अपंगत्व – ७ पदे)).
पात्रता – पदवी कोणतीही शाखा. अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (मुख्य परीक्षेसाठी पात्र होणाऱया उमेदवारांनी पदवी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.)वयोमर्यादा – (दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी) २१ ते ३२ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९४ ते दि. १ ऑगस्ट २००५ दरम्यानचा असावा.) (इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४२/४५/४८ वर्षेपर्यंत)
पूर्वपरीक्षेसाठी केंद्र – मुंबई, छ. संभाजी नगर, नागपूर, नाशिक, पुणे, नवी मुंबई, ठाणे, पणजी इ. देशभरातील ८३ केंद्र (चेन्नई, दिसपूर, कलकत्ता आणि नागपूर केंद्र वगळता सर्व केंद्रांवर ठराविक उमेदवारांची परीक्षा घेतली जावू शकते व ते सेंटर प्रथम येणाऱयास प्रथम पसंतीक्रमाने दिले जाईल आणि एकदा का त्या केंद्राची क्षमता संपली की उमेदवारांना जवळच्या दुसऱया केंद्रावर सामावून घेतले जाईल.) याकरिता उमेदवारांनी २ केंद्रांची निवड करावी. आपल्या पसंतीचे केंद्र मिळविण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.मुख्य परीक्षेसाठी केंद्र – मुंबई, अहमदाबाद, हैद्राबाद, रायपूर, विजयवाडा, भोपाळ, बेंगलुरू इ. २७ केंद्रे.
परीक्षा शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/महिला/दिव्यांग यांना फी माफ आहे.) ऑनलाईन मोडने फी दि. २४ फेब्रुवारी २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत भरता येईल.निवड पद्धती – (१) सिव्हील सर्व्हिसेस पूर्वपरीक्षा जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल, ज्यातून सिव्हील सर्व्हिसेस मुख्य परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातील. (२) सिव्हील सर्व्हिसेस मुख्य परीक्षा (लेखी परीक्षा व इंटरह्यू) यातून विविध सर्व्हिसेस आणि पदांसाठी उमेदवार निवडले जातील.
पूर्वपरीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाईप दोन पेपर प्रत्येकी २०० गुणांसाठी. (१) पेपर-१ – जनरल स्टडीज – २०० गुण, वेळ २ तास, (२) पेपर-२ – जनरल स्टडीज – २०० गुण, वेळ २ तास. पेपर-२ फक्त पात्रता स्वरूपाचा असेल, ज्यात पात्रतेसाठी किमान ३३ टक्के आवश्यक. (प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.३३ गुण वजा केले जातील.) दोन्ही पेपरातील प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेत असतील. पूर्व परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. पूर्व परीक्षेतील पेपर-२ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार मुख्य परीक्षेसाठी रिक्त पदांच्या १३ पट उमेदवार निवडले जातील.
मुख्य परीक्षा (वर्णनात्मक स्वरूपाची) (Conventional Essay Type) – (१) पेपर-ए – भारतीय संविधानाच्या ८ व्या परिशिष्टामधील उमेदवाराने निवडलेली एक भाषा. (२) पेपर-बी – इंग्रजी. दोन्ही पेपर पात्रता स्वरूपाचे. प्रत्येकी ३०० गुण. पात्रतेसाठी प्रत्येकी २५ टक्के गुण आवश्यक. पेपर-ए आणि पेपर-बी चे गुण अंतिम निवडीसाठी मोजले जात नाहीत.
अंतिम गुणवत्ता ठरविण्यासाठी एकूण ७ पेपर. प्रत्येकी २५० गुणांसाठी. ( पेपर-१ – निबंध; पेपर-२ ते पेपर-५ – जनरल mì[erpe-I ते IV; पेपर-६ व ७ ऑप्शनल विषयावर आधारित दोन पेपर. प्रत्येक पेपरचा कालावधी ३ तासांचा. लेखी परीक्षेतील एकूण १७५० गुण आणि इंटरह्यू/पर्सोनॅलिटी टेस्ट (पात्रतेसाठी किमान गुण निर्धारित केलेले नाहीत.) – २७५ गुण, एकूण २०२५ गुण; मुख्य परीक्षा उमेदवार संविधानाच्या ८ व्या परिशिष्टामधील दिलेल्या कोणत्याही एका भाषेत लिहू शकतात.) UPSC, पेपर क्र. १ ते ७ मधील कोणत्याही किंवा सर्व पेपर्ससाठी किमान पात्रतेचे गुण निर्धारित करू शकतात.यू.पी.एस्.सी. चे मार्गदर्शन केंद्र संपर्क टेलिफोन नं. ०११-२४०४१००१ (कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजे दरम्यान).
ई-मेल आयडी upscsoap@nic.in
विस्तृत जाहिरात http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज कसा करावा याच्या सूचना DeHeWef[keÌme-II मध्ये उपलब्ध आहेत. पात्र असल्यास उमेदवार सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तसे नमूद करू शकतात. पूर्व परीक्षा पात्र ठरल्यानंतर उमेदवारांना सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनसाठीच्या वेगवेगळ्या होणाऱया मुख्य परीक्षांसाठी अर्ज भरावे लागतील.
ऑनलाइन अर्ज मागे घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. (१) निवड प्रक्रियेच्या तीनही टप्प्यांवर उमेदवार हा अर्जात अपलोड केलेल्या फोटोप्रमाणेच प्रत्यक्षात दिसणे अपेक्षित आहे. तसेच ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराचा लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर केला जाईल. (२) सिग्नेचर अपलोड करणे – उमेदवारांनी कोऱया पांढऱ्या कागदावर एकाखाली एक अशा काळ्या शाईने तीन सह्या करून स्कॅन करून कॉमन अॅप्लिकेशन फॉर्मवर अपलोड करावयाच्या आहेत.
ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरताना पुढील माहिती भरणे अनिवार्य आहे. (१) सिव्हील सर्व्हिसेस मुख्य परीक्षा आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, निवडलेला ऑप्शनल सब्जेक्ट आणि त्यासाठीचे परीक्षेचे माध्यम इ. (२) विविध सेवांचा पसंतीक्रम.
ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २४ फेब्रुवारी २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.
सुहास पाटील ९८९२००५१७१३
