UPSC Civil Service Exam Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल काल (मंगळवार, २३ मे) जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात महाराष्ट्रातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. मुंबईतील हज हाऊस येथे हज कमिटी ऑफ इंडियाद्वारे चालवल्या जाणार्‍या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांनी यंदाच्या यूपीएससी परिक्षेत बाजी मारली आहे. आयेशा काझी, सय्यद एम. हुसेन, तस्कीन खान आणि एम. बुरहान जमान अशी या चार यशस्वी विद्यार्थ्यांची नावं आहेत.

या चौघांनाही २०२१ च्या अखेरीस संस्था सोडावी लागली होती, कारण हज कमिटीने संस्थेतील प्रवेश क्षमता कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे चौघे जाफर सुलेमान आयएएस संस्थेत दाखल झाले. सय्यद एम. हुसेन हा या परिक्षेची तयारी करण्यासाठी आधी पुण्याला आणि नंतर दिल्लीला गेला. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे तो हज हाऊसला आला. त्यानंतर तो सुलेमान आयएएस संस्थेत गेला.

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Nawab Malik was admitted to the hospital due to deterioration of his health
मुंबई : प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक रुग्णालयात दाखल
Encroachment by Navi Mumbai mnc
पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय

हुसैनने पाचव्या प्रयत्नात या परिक्षेत यश मिळवलं आहे. त्याने ५७० वा रँक मिळवला. त्याला आयपीएस किंवा आयआरएस व्हायचं आहे. २७ वर्षीय हुसैन हा मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गोदी कामगाराचा मुलगा आहे. त्याने मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. कॉम केलंय. हुसैनने त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या वडीलांना दिलं. तो म्हणाला, माझे वडील म्हणतात की, मी शिकलो नाही त्यामुळे गोदीत काम करू लागलो. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. त्यांनी आम्हाला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यांनीच मला अधिकारी होण्यासाठी, ही परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

हुसैन केवळ स्वतःच्याच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून थांबला नाही तर तो जाफर सुलेमान आयएएस इन्स्टिट्यूटमध्ये इतर विद्यार्थ्यांनाही शिकवायचा. हुसैन म्हणाला “मला शिकवण्याची आवड आहे आणि हा अभ्यास करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे असं मला वाटतं,” हुसैनचा एक यूट्युब चॅनेलदेखील आहे. ज्यावरून तो इतरांना मार्गदर्शन करतो.

हुसैनला ज्या ज्या संस्थांमधून मार्गदर्शन मिळालं त्या सर्व संस्थांचे त्याने आभार मानले. तसेच त्याने त्याच्या कुटुंबाचेही आभार मानले. तो म्हणाला, “माझ्या आई-वडिलांमुळे आणि मोठ्या भावंडांमुळे मला कशाचंही ओझं वाटलं नाही. त्यांच्यामुळेच मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकलो.

हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्

कळव्याची आयशा काझी आयएफएस होणार

हज हाऊस संस्थेच्या आणखी एक विद्यार्थिनीनीने यूपीएससी परिक्षेत यश मिळवलं आहे. आयशा काझी असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिला भारतीय विदेश सेवेत (IFS) काम करायचं आहे. आयशा ही ठाण्यातल्या कळवा येथील रहिवासी आहे. तिने यूपीएससीत ५८६ वा रँक मिळवला आहे. आयशा म्हणाली, ५८६ व्या रँकसह मला आयएफएस मिळेल की नाही याबाबत थोडी शंका आहे. आरक्षणाच्या मदतीने कदाचित मला ती संधी मिळेलही. अन्यथा माझी आयआरएससाठी निवड होईल. तसं झालं तर मी आयएफएससाठी पुन्हा एकदा प्रयत्न करेन. आयशा ही मुंबईच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातून इतिहास विषयातून पदवीधर झाली आहे.