UPSC application form 2026 last date extended: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. ही परीक्षा २४ मे २०२६ रोजी होणार आहे. तर यासाठीची मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा ही पाच दिवस चालणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. आज (२४ फेब्रुवारी) अर्ज करण्याचा अखेरचा दिवस होता. पण सकाळपासून ‘यूपीएससी’चे संकेतस्थळ चालत नव्हते.
नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ साठी ४ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार होते. पण आता यामध्ये तीन दिवस वाढवून देण्यात आले आहेत. आता या परीक्षेसाठी २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत वाढवल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सर्व उमेदवारांनी या तीन दिवसांत अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून करण्यात आले आहे.
दोन्ही परीक्षेची मुदत वाढली
नागरी सेवा परीक्षा, २०२६ आणि भारतीय वन सेवा परीक्षा, २०२६ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता तीन तीन दिवसांनी म्हणजेच २७.०२.२०२६ पर्यंत (सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिली आहे.
यूपीएससी सीएसई परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?
- प्रथम, UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
- जर तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल, तर “नवीन नोंदणी” वर क्लिक करून खाते तयार करा.
- तुमची मूलभूत माहिती भरल्यानंतर एक युनिव्हर्सल नोंदणी क्रमांक (URN) तयार होईल.
- यानंतर कॉमन अॅप्लिकेशन फॉर्म उघडा आणि शैक्षणिक पात्रता, परीक्षा केंद्र, विषय आदी आवश्यक माहिती भरा.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज शुल्क भरा.
- जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे.
- महिला, एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी अर्ज प्रक्रिया विनामूल्य आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
- नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २७ फेब्रुवारी २०२६
- प्राथमिक (Prelims) परीक्षा – २४ मे २०२६
- मुख्य (Mains) परीक्षा – २१ ऑगस्ट २०२६
शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
- अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात; मात्र त्यांना मुख्य परीक्षेपूर्वी पदवी पूर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
