केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) (Examination Notice No. ०६/२०२६-IFoSE, dated २२.०१.२०२५). ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन २०२६’ साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांना सिव्हील सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२६ द्यावी लागेल. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षेसाठी निवडले जाईल.

एकूण रिक्त पदे ८० (अजा – १२, अज – ६, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३३). यातील प्रत्येकी १ पद दिव्यांग (कॅटेगरी VH, HH, LD) साठी राखीव.

पात्रता – पुढीलपैकी एका विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण (अॅनिमल हजबंडरी अँड वेटेनिअरी सायन्स, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, जीओलॉजी, झूऑलॉजी, मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स) किंवा अॅग्रिकल्चर, फोरेस्ट्री किंवा इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण. पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (पदवीचा निकाल इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी लागणे आवश्यक.)

वयोमर्यादा – (दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी) २१ ते ३२ वर्षे. (इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत)

शारीरिक मापदंड – पुरुष – उंची – १६३ सें.मी., छाती – ७९ ते ८४ सें.मी. महिला – उंची – १५० सें.मी. छाती – ७४-७९ सें.मी.

निवड पद्धती – (१) सिव्हील सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. (२) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षा (लेखी परीक्षा व इंटरह्यू)सिव्हील सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा दि. २४ मे २०२६ रोजी घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप – दोन पेपर. प्रत्येकी २०० गुणांसाठी. (१) जनरल स्टडीज पेपर-१ – २०० गुणांसाठी वेळ २ तास.

(२) जनरल स्टडीज पेपर-२ – २०० गुणांसाठी वेळ २ तास. (पात्र ठरण्यासाठी किमान ३३… गुण आवश्यक.)प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ३३… गुण वजा केले जातील. दोन्ही पेपरांतील प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेत असतील. पूर्व परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. जनरल स्टडीज पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (मुख्य) परीक्षेसाठी निवडले जातील. साधारणत रिक्त पदांच्या १२ ते १३ पट उमेदवार निवडले जातील.

पूर्व परीक्षेसाठी केंद्र – मुंबई, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, छ. संभाजी नगर, नाशिक, पुणे, पणजी इ. देशभरातील एकूण ८३ केंद्र.मुख्य परीक्षा – नोव्हेंबर, २०२६ मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षेसाठी केंद्र – नागपूर, भोपाळ, हैद्राबाद इ. देशभरातील एकूण १० केंद्र.

(अ) लेखी परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल. पेपर-१ – जनरल इंग्लिश ३०० गुण, पेपर-२ – जनरल नॉलेज ३०० गुण. ऑप्शनल सब्जेक्ट्सच्या लिस्टमधून उमेदवारांना दोन विषय निवडावे लागतील. ((१) अॅग्रिकल्चर, (२) अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग, (३) अॅनिमल हजबंडरी अँड वेटनिअरी सायन्स, (४) बॉटनी, (५) केमिस्ट्री, (६) केमिकल इंजिनीअरिंग, (७) सिव्हील इंजिनीअरिंग, (८) फॉरेस्ट्री, (९) जीओलॉजी, (१०) मॅथेमॅटिक्स, (११) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (१२) फिजिक्स, (१३) स्टॅटिस्टिक्स, (१४) झूओलॉजी) उमेदवारांना पुढील विषय एकत्रपणे निवडता येणार नाही – (१) केमिस्ट्री, केमिकल इंजिनीअरिंग; (२) अॅग्रिकल्चर, अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग; (३) अॅग्रिकल्चर, अॅनिमल हजबंडरी अँड वेटेनिअरी सायन्स; (४) अॅग्रिकल्चर, फॉरेस्ट्री; (५) मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स; (६) कोणतेही २ इंजिनीअरिंग विषय. प्रत्येक विषयासाठी दोन पेपर प्रत्येकी २०० गुणांसाठी असतील. मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स इंग्रजी भाषेत असतील. प्रत्येक पेपरला ३ तासांचा वेळ दिला जाईल.(ब) पर्सोनॅलिटी टेस्ट – एकूण ३०० गुणांसाठी असेल. पर्सोनॅलिटी टेस्टसाठी रिक्त पदांच्या दुप्पट उमेदवार निवडले जातील.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/महिला/दिव्यांग यांना फी माफ आहे.)पात्र असल्यास उमेदवार सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तसे नमूद करू शकतात. पूर्व परीक्षा पात्र ठरल्यानंतर उमेदवारांना सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनसाठीच्या वेगवेगळ्या होणाऱया मुख्य परीक्षांसाठी अर्ज भरावे लागतील.

ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २४ फेब्रुवारी २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करता येतील. अर्जासोबत वय, शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठीचे दाखले अपलोड करावयाचे नाहीत. E-admit Card http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२४०४१००१. ई-मेल आयडी upscsoap@nic.in ऑनलाइन अर्ज मागे घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही.

सुहास पाटील ९८९२००५१७१