यूपीएससी मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय हा किंगमेकर मानला जातो. ५०० गुणांसाठीचा एक विषय विद्यार्थ्यांना निवडावा लागतो. जीएसच्या पेपरच्या तुलनेत वैकल्पिक विषयात चांगले गुण मिळतात. गुणवत्ता यादीतील तुमचे स्थान निश्चित करण्यात वैकल्पिक विषयाचा मोठा वाटा असतो. यातील मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाबाबत आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
वैकल्पिक विषय पेपर पॅटर्न :
गुण – ५०० गुण, यात २५० गुणांचे २ पेपर असतात.
रचना – २५० गुणांसाठी ५० गुणांचे ५ प्रश्न लिहायचे असतात. पेपरमध्ये एकूण ८ प्रश्न विचारले जातात. सेक्शन ‘अ’ मध्ये १ ते ४ प्रश्न व सेक्शन ‘ब’ मध्ये ५ ते ८ प्रश्न असतात. त्यापैकी प्रश्न क्रमांक १ व ५ हे अनिवार्य असतात. तसेच सेक्शन ‘अ’ व ‘ब’ पैकी एका सेक्शन मधून २ व दुसऱ्या सेक्शन मधून किमान १ प्रश्न लिहिणे अनिवार्य असते.
अभ्यासक्रम: पेपर पहिला
विभाग १ : भाषा आणि लोकसाहित्य
(1) भाषेचे स्वरूप आणि कार्य
एक संकेत प्रणाली म्हणून भाषेचा वापर
भाषा आणि भाषण
भाषेची मूलभूत कार्ये
काव्यात्मक भाषा, प्रमाणभाषा, बोलीभाषा
सामाजिक प्रमाणकांनुसार भाषा परिवर्तन
13 व्या आणि 17 व्या शतकातील मराठीची भाषिक वैशिष्ट्ये
(ब) मराठीची बोली
अहिराणी, वऱ्हाडी, डांगी
(क) मराठीचे व्याकरण
शब्दांच्या जाती, विभक्ती – कारक व्यवस्था, प्रयोग विचार
(ड) लोकसाहित्याचे स्वरूप व प्रकार
लोकगीत, लोककथा, लोकनाट्य
विभाग २ : वाड्.मयाचा इतिहास आणि वाड्.मयीन समीक्षा
(1) मराठी वाड्.मयाचा इतिहास
प्रारंभ ते १८१८
महानुभाव, वारकरी, पंडिती, शाहीर, बखर
१८५० ते १९९०
कविता, कथा, कादंबरी, नाटक, स्वच्छंदवाद, वास्तववाद, ग्रामीण व दलित, स्त्रीवादी साहित्य, मुख्य साहित्यिक प्रवाह / चळवळी
(ब) समीक्षा
साहित्याचे स्वरूप आणि प्रयोजन
साहित्याचे मूल्यांकन
समीक्षेचे स्वरूप, कार्य व पद्धती
साहित्य समाज आणि संस्कृती
मराठी वाड्.मय पेपर पहिला संदर्भग्रंथ सूची
स्पॉटलाईट नोट्स
प्रदक्षिणा खंड १ व २ : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
प्राचीन वाड्.मयाचा इतिहास : नसिराबादकर
संत वाड्.मयाची सामाजिक फलश्रुती : गं. बा. सरदार
महानुभाव पंथ आणि वाड्.मय : शं. गो. तुळपूळे
आधुनिक भाषाविज्ञान : मिलिंद मालशे
लोकसाहित्य : विश्वनाथ शिंदे
मराठीचे व्याकरण : लीला गोविलकर / मो. रा. वाळिंबे
साहित्यसिद्धांत : स. ग. मालशे
साहित्यविचार : अ. वा. कुलकर्णी
भाषा आणि भाषाशास्त्र : डॉ. श्री. न. गजेंद्रगडकर
२०२६ च्या मुख्य परीक्षेत विचारलेले प्रश्न बघा –
प्र. भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेची विविध लक्षणे सांगा. २० गुण
प्र. शब्दांच्या जातीकिती व कोणत्या ते सांगूनत्यांची सोदाहरण चर्चा करा. १५ गुण
पेपर दुसरा
विभाग १ : गद्य विभाग
‘स्मृतिस्थळ’
महात्मा ज्योतिबा फुले –
- ‘शेतकऱ्याचा असूड’
- ‘सार्वजनिक सत्यधर्म’
‘ब्राह्मणकन्या’ – श्री. व्यं. केतकर
‘साष्टांग नमस्कार’ – प्र. के. अत्रे
‘जन हे वोळतु जेथे’ – शरच्चंद्र मुक्तिबोध
‘शिळान’ – उद्धव शेळके
‘जेव्हा मी जात चोरली होती!’ – बाबुराव बागूल
‘एकेक पान गळावया’ – गौरी देशपांडे
‘आठवणींचे पक्षी’ – प्र. ई. सोनकांबळे
विभाग २ : पद्य विभाग
‘नामदेवांची अभंगवाणी’ : संपादक – इनामदार, रेळेकर, मिरजकर
‘पैंजण’ : संपादक – म. ना. अदवंत
‘दमयंती स्वयंवर’ – रघुनाथ पंडीत
‘बालकवींची कविता’ – बालकवी
‘विशाखा’ – कुसुमाग्रज
‘मृदगंध’ – विंदा करंदीकर
‘जाहीरनामा’ – नारायण सुर्वे
‘संध्याकाळच्या कविता’ – ग्रेस
‘या सत्तेत जीव रमत नाही’ – नामदेव ढसाळ
मराठी वाड्.मय पेपर दुसरा संदर्भग्रंथ –
स्पॉटलाईट नोट्स
पेपर दोन मध्ये १०० गुणांसाठी रसास्वाद विचारले जातात ज्यात, वर अभ्यासक्रमातील पुस्तकांमधून काही ओळी दिल्या जातात. त्यांचे संदर्भ सांगून त्यातील मतितार्थ व भाषिक वैशिष्टे लिहिणे अपेक्षित असते. आपण शालेय जीवनात संदर्भ सांगून अर्थ स्पष्ट करा असे प्रश्न सोडविले आहेत, त्याचेच प्रतिबिंब म्हणजे रसास्वाद! २०२६ च्या पेपरमधील रसास्वादासाठीच्या ओळी बघा –
“पुरुष बहुधा मठ्ठ असतातच, पण आता इतक्या बाया पाहून मला तर वाटायला लागलंय की त्यांच्याशी संसार करायला मठ्ठ पुरुषच हवेत!”
२०२६ च्या मुख्य परीक्षेत विचारलेले प्रश्न बघा –
प्र. ‘शिळान’ कथासंग्रहात कृषिसंस्कृतीवर आधारित मानवी जीवनाचे प्रतिबिंब कसे उमटले आहे, ते स्पष्ट करा. १५ गुण
प्र. “शृंगार रस आणि वीरस ही शाहिरी कवितेची बलस्थाने होत”, कसे ते ‘पैंजण’च्या आधारे स्पष्ट करा. १५ गुण
वैकल्पिक मराठी विषयात गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाआधारे नियमित लिखाण करून आपण चांगले गुण मिळवू शकतो. कारण हा विषय स्टटिक असून यात खूप बदल होत नाहीत.
